Lockdown : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दहा जणांवर पोलिसांची धडक कारवाई

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दहा जणांवर शहर व शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
Crime News
Crime Newsesakal

सातारा : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दहा जणांवर शहर व शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक पोलिस निरीक्षक संजय पतंगे व कर्मचारी गस्त घालत असताना विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. (Police Action Against Ten People In Satara Crime News)

या प्रकरणी हवालदार आशिष कुमठेकर यांच्या फियादीनुसार, रविंद्र शंकर पाठक (वय 72, रा. मंगळवार पेठ), शामराव इब्राहिम शेख (वय 34, रा. बाबर कॉलनी, करंजे), इजाज इकबाल शेख (वय 33, रा. शुक्रवार पेठ) व विनोद विजय शिखरे (वय 47, रा. व्यंकटपूरा पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर, सईद अली हुसेन बागवान (वय 34, रा. शाहूपुरी), मनिषा सुभाष कोकाडे (वय 20, रा. हेरंब पॉईंट, करंजे), प्रमोद दिलीप पन्हाळे (रा. माजगावकर माळ झोपडपट्टी) यांच्याविरूद्ध हवालदार पंकज मोहिते यांनी फिर्याद दिली आहे.

मरीआई कॉम्पलेक्‍ससमोर मद्य पिऊन रस्त्यावर वाहने वेडीवाकडे चालवल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यशवर्धन दिपक पवार (वय 21, रा. संमित्र हौसिंग सोसायटी), अभिलाष विनोद शिंदे (वय 22, रा.काळेश्‍वरी सोसायटी) व दर्शन मालोजी घोरपडे (वय 21, रा. प्रथमेश कुंज शाहूनगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार शैलेंद्र बबन निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार कारळे तपास करत आहेत.

धक्कादायक! उंब्रजच्या जवानाचा कोरोनानं घेतला बळी; साताऱ्यावर शोककळा

Police Action Against Ten People In Satara Crime News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com