esakal | पीडब्ल्यूडीत नोकरी लावतो सांगून सांगलीतील एकाने लाखो रुपये लाटले
sakal

बोलून बातमी शोधा

पीडब्ल्यूडीत नोकरी लावतो सांगून सांगलीतील एकाने लाखो रुपये लाटले

अखेर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल भंडारे करत आहेत.

पीडब्ल्यूडीत नोकरी लावतो सांगून सांगलीतील एकाने लाखो रुपये लाटले

sakal_logo
By
सलाउद्दीन चाेपदार

म्हसवड (जि. सातारा) : स्वत:ची वेगवेगळी तीन नावे धारण करून बेरोजगार तरुणांना नोकरीस लावण्याचा बहाणा करून लाखो रुपयांचा गंडा घातलेला भामटा अखेर जेरबंद करण्यात आला. येथील श्री नागोबा देवस्थान मंदिरात चाकरी (सेवा) करणाऱ्या खराडे वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील वामन विष्णू जानकर ऊर्फ सत्यवान भानुदास मोहिते (वय 59) या सेवेकऱ्याने म्हसवड व परिसरातील ग्रामस्थांच्या मुलांना बांधकाम विभागात, पीडब्ल्यूडी, बीएसटीमध्ये नोकरीला लावतो म्हणून अडीच लाख रुपये घेऊन माझ्या मुलाची फसवणूक केली. 

त्याचप्रमाणे इतरही लोकांकडून तीन लाख घेऊन फसवणूक केल्याची तक्रार संभाजी आण्णा शिंगाडे (रा. धुळदेव, ता. माण) यांनी पोलिसांत दिली. संबंधित संशयित जानकर यांनी तीन नावाची वेगवेगळी आधार कार्ड वापरून लोकांना फसवत होता. अखेर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल भंडारे करत आहेत. 

FasTag कसं मिळवाल आणि कधीपर्यंत असते वॅलिडिटी? वाचा सविस्तर

विष्णू श्री स्मृती बंगल्यात गांजासदृश वनस्पतीची लागवड; जर्मन युवकांना अटक

मृत महिलेच्या दागिन्यांची झाली चोरी; सिव्हीलची अब्रू चव्हाट्यावर

परदेशी पाहुण्यांना मायणी तलावाचा विसर; फ्लेमिंगोंची अद्याप गैरहजेरी

CoronaUpdate : वाढती रुग्णसंख्या राेखण्यासाठी आठवडा बाजार रद्द; प्रांताधिकाऱ्यांचे उपायाचे निर्देश

फेक टीआरपी प्रकरण: राज्य सरकार आणि मुंबई पोलिस रिपब्लिक टीव्हीला लक्ष्य करत आहे, असा आरोप याचिकेत केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top