esakal | वडजला जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; फलटणातील सातजण ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Phaltan

वडजला जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; फलटणातील सातजण ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फलटण शहर (सातारा) : वडजल (ता. फलटण) येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) एक लाख 67 हजार 110 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

संभाजी साहेबराव चोरमले (वय 45, रा. बुधवार पेठ, फलटण), गजानन महादेव डोंबाळे (वय 35, रा. बुधवार पेठ), संदीप जगन्नाथ कांबळे (वय 54, रा. निंभोरे, ता. फलटण), डबलूसिंग विवेकानंद सिंग (वय 36, रा. निंभोरे, ता. फलटण), समीर चंदूभाई मारोट (वय 46, रा. निंभोरे, ता. फलटण), ज्ञानेश्वर रामदास जगताप (वय 47, रा. अपर इंदिरानगर), शरद बाळू खवळे (वय 30, रा. निंभोरे, ता. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.

एकंबेत डबल सेंच्युरी; घरोघरी बाधित सापडल्याने गाव बनले 'हॉटस्पॉट'

वडजल येथे एका शेतात असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा चालू असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार वडजल येथे छापा टाकण्यात आला. या वेळी सात जण जुगार खेळत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल, एक दुचाकी, असा 1 लाख 67 हजार 110 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, विशाल पवार, सचिन ससाणे, विजय सावंत, नीलेश काटकर सहभागी होते.

Edited By : Balkrishna Madhale

loading image