पोलिसांना पाहताच जुगार खेळणारे पळू लागले; नगरसेविकेच्या मुलासह सहा जण सापडले

पोलिसांना पाहताच जुगार खेळणारे पळू लागले; नगरसेविकेच्या मुलासह सहा जण सापडले

सातारा : सातारा शहरातील बुधवार नाक्‍यावरील वॉशिंग सेंटरलगतच्या जुगार अड्ड्यावर सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख व शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संशयितांमध्ये सातारा पालिकेच्या नगरसेविकेच्या मुलाचाही समावेश आहे.
 
प्रवीण ऊर्फ गोट्या दत्तात्रय जगताप (वय 27, रा. प्रतापगंज पेठ), जतिन संजय वाघमारे (वय 27, रा. बुधवार पेठ), अमर शंकर आवळे (रा. बुधवार नाका), किरण अनिल कुऱ्हाडे (रा. करंजे पेठ), संजय तानाजी भिसे (वय 29, रा. शाहूनगर), वासुदेव शिवाजी जांभळे (वय 30) व रोशन चंद्रकांत जगताप (वय 22, दोघे रा. दुघी, ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी हवालदार ओमकार यादव यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अमर आवळे हा विद्यमान नगरसेविकेचा मुलगा आहे.

बामणोली-तापोळा जोडणारी लॉंच त्वरित सुरू करा : राजेंद्र संकपाळ

सातारा शहरात विविध ठिकाणी छुप्या पध्दतीने जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बुधवार नाका येथे जुगार अड्डा सुरू असल्याने सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी शाहूपुरी पोलिसांचे पथक तयार करून स्वत: छापा टाकला. पोलिसांना पाहताच जुगार खेळणाऱ्या संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले.

बोगस पदभरती प्रकरणात चौकशी समिती; तत्कालीन अधिकाऱ्यांकडे चौकशीचा तगादा
 
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रोख रक्कम, स्लिप बुक, मोबाईल, दुचाकी असा एक लाख पाच हजार 830 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com