दोन किलोमीटरचा थरारक पाठलाग; चाेरटे पोलिसांच्या ताब्यात

दोन किलोमीटरचा थरारक पाठलाग; चाेरटे पोलिसांच्या ताब्यात

कऱ्हाड : संचारबंदी असूनही कारमधून दोन मेंढ्या चोरणाऱ्या पोलिस रेकॉर्डवरील दोघांना मध्यरात्री पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. मुंढे येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास घटना घडली. फौजदार अर्जुन चोरगे व त्यांचे दोन सहकारी रात्रगस्तीसाठी मुंढे भागात गेले. त्या वेळी त्या दोघांना अटक केली. मल्हारी गणपती दुजले (वय 35) व सुधीर रामचंद्र नाईक (26, दोघे रा. मुंढे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर पोलिसात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
 
पोलिसांनी सांगितले, की फौजदार चोरगे त्यांचे दोन सहकारी वाहनचालक हवालदार दादासाहेब माळी व गणेश देशमुख यांच्यासह विभागीय रात्रगस्त घालत होते. तिघांकडे शहर पोलिस ठाण्यातील मोठे वाहन होते. शहरातील महामार्गावरील गावात विभागीय पट्रोलिंग करताना रात्री दोनच्या सुमारास ते मुंढे गावच्या हद्दीत गेले. त्यांची गाडी गावात जात असतानाच त्यांना समोरून कार येताना दिसली. संचारबंदी असूनही कार घेऊन कोण फिरतो, याच्या चौकशीसाठी त्यांनी ती कार थांबविण्याता प्रयत्न केला, तरीही कार थांबली नाही. शेवटी त्यांनी कारला पोलिस गाडी आडवी मारली. त्या वेळी कार थांबली. मात्र, कारमधील दोघांनी कार तेथेच सोडून रस्ता मिळेल त्या दिशेने धावण्यास सुरुवात केली. ती गोष्ट लक्षात येताच फौजदार चोरगे व त्यांचे सहकारी माळी, देशमुख यांनीही त्यांची गाडी थांबवून पळणाऱ्यांचा पाठलाग सुरू केला.

सोसायटी ठरावावरून राडा; राजकारणातील गुन्हेगारी मोडण्यात प्रशासन कुचकामी

अंधाराचा फायदा घेऊन चोरटे रानावनातून पळत सुटले. पोलिसही त्यांच्या मागे धावत होते. रानातून किमान दोन किलोमीटरचा पाठलाग केल्यानंतर दोघेही पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांनी मेंढ्यांची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या कारमध्ये पाहिले त्या वेळी दोन मेंढ्या त्यांना सापडल्या. त्याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मुंढे येथेच मेंढपाळ्याच्या तळावरील त्या मेंढ्या आहेत. त्याची खात्री पोलिसांनी केली. सहायक फौजदार सतीश जाधव तपास करत आहेत. 

सौरभ पाटलांच्या तोंडाला कुलूप होते का? भाजप नगराध्यक्षा आक्रमक

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com