सातारा : लाल मातीबरोबर खाकीशीही इमान

पैलवानांना आवरायला पोलिस दलातील पैलवान तैनात; २४ जणांची नेमणूक
police force to cover wrestlers Maharashtra kesari Competition satara
police force to cover wrestlers Maharashtra kesari Competition satarasakal

सातारा : येथे महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेतील रंगत वाढीस लागली असून अटीतटीच्‍या लढतीदरम्‍यान अनेक वेळा लढणाऱ्या मल्‍लांच्‍या समर्थकांमध्‍ये तणाव निर्माण होतो. हा तणाव कमी करण्‍याचा प्रयत्‍न बंदोबस्‍तावरील पोलिस कर्मचारी करत असले तरी त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना अनेकदा मर्यादा पडतात. हे ओळखून पैलवानांना आवारायला पोलिस दलातील पैलवान नियुक्‍त करण्‍याचा निर्णय घेत त्‍यासाठी २४ जणांना महाराष्‍ट्र केसरीच्‍या आखाड्याजवळ नेमण्‍यात आले आहे. हे कर्मचारी पैलवानाशी पैलवानकीच्‍या भाषेत बोलून त्‍यांना शांत करतात.

महाराष्‍ट्र केसरीच्‍या आखाड्यात झुंजण्‍यासाठी राज्‍यभरातील ९०० मल्‍ल हे ४५ संघांच्‍या माध्‍यमातून येथे दाखल झाले आहेत. गेले तीन दिवस एकमेकांच्‍या ताकदीचा अंदाज घेत हे मल्‍ल झुंजत आहेत. साताऱ्यासह राज्‍यभरातील नागरिक आणि कुस्‍तीशौकिनांच्‍या नजरा उपउपांत्‍य, उपांत्‍य फेरीसह अंतिम लढतीकडे लागल्‍या आहेत. मैदानात सुरू असणाऱ्या लढतीदरम्‍यान पुकारा झाल्‍यानुसार आखाड्याजवळ मल्‍ल, प्रशिक्षक दाखल होतात. त्‍यांच्‍या पाठीमागे लढणाऱ्या मल्‍लांचे पाठीराखेही असतात. स्‍पर्धा अंतिम टप्‍प्‍यात असल्‍याने मल्‍ल आपले पूर्ण कसब, ताकद आणि ज्ञान विरोधकाला चितपट करण्‍यासाठी वापरतात. हे करताना त्‍याला आखाड्याबाहेरून आवश्‍‍यक असणारे डावपेच सांगण्‍याचा प्रयत्‍न करतात. त्यातूनच अनेकदा वाद निर्माण होतात. हे वाद मिटवण्‍यासाठी पोलिस प्रयत्‍न करतात. मात्र, त्‍यांना मल्‍लांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

त्यामुळे जिल्‍हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्‍सल, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी पोलिस दलात कार्यरत असतानाही लाल मातीशी नाळ न तोडलेल्‍या व इतर शारीरिक मेहनीच्‍या खेळात गुंतलेल्‍या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्‍याच्‍या सूचना इतर अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी क्रीडा प्रमुख शशिकांत गोळे यांना तशा सूचना करत पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या मल्‍लांची यादी तयार करण्‍यास सांगितले. तयार केलेल्‍या यादीस वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी मान्‍यता दिल्‍यानंतर दलात कार्यरत असणाऱ्या मल्‍लांना आखाड्याजवळ मैदानी पोषाखात नेमणुका देण्‍यात आल्‍या. स्‍पर्धा शांततेत पार पाडण्‍यासाठी तसेच वाद घालणाऱ्या मल्‍लांना पैलवानकीच्‍याच भाषेत समजावून शांत करण्‍याचे जिकिरीचे काम तैनात पोलिस दलातील २४ मल्‍ल जवान करताहेत. त्‍यांच्‍यामुळे काही अंशी इतरांवरील ताण कमी होत आहे.

...हे आहेत बंदोबस्तावरील पैलवान

शहाजी राजगे, शिवाजी ठेंगील, जयसिंग राजगे, लक्ष्‍मण बुधावले,संतोष पवार, संतोष त्रिंबके, नीलेश यादव, दादा राजगे, जयवंत बुधावले, समाधान गाढवे, पंकज ढाणे, धीरज महाडिक, पंकज भुजबळ,प्रमोद जाधव, अतुल कणसे, दीपक घाटगे, आकाश दळवी,सूरज परिहार, सिध्‍दनाथ शेडगे, संदीप शेडगे, योगेश सूर्यवंशी,चेतन वाघमळे, सागर लोखंडे, वैभव वसव.

- गिरीश चव्‍हाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com