esakal | तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मसूरला पोलिस ठाणे; शासनाच्या गृह विभागाकडून मंजुरी

बोलून बातमी शोधा

Police Station
तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मसूरला पोलिस ठाणे; शासनाच्या गृह विभागाकडून मंजुरी
sakal_logo
By
गजानन गिरी

मसूर (सातारा) : शासनाच्या गृह विभागाने येथील पोलिस ठाण्याला मंजुरी दिली आहे. 20 वर्षांपासूनची मागणी त्यामुळे पूर्ण झाली आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने पोलिस ठाण्याला मंजुरी मिळाली असून, पोलिस निरीक्षकासह अन्य अधिकारी व कर्मचारी अशा 30 पदांना मान्यता देण्यता आली आहे.

परिसरातील कार्य क्षेत्राचा कामकाजाचा व्याप पाहता येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याची आवश्‍यकता होती. त्यानुसार सातारा पोलिस जिल्हा यांच्या आस्थापनेवरील तळबीड पोलिस ठाण्याचे विभाजन करण्यात आले. उंब्रज पोलिस ठाणे अंकित मसूर दूरक्षेत्राचे रूपांतर नवीन पोलिस ठाण्यात करण्यात आले आहे. त्याअंतर्गत एक पोलिस निरीक्षक एक सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, हवालदार, पोलिस नाईक, पोलिस शिपाई अशी एकूण 30 पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तळबीड पोलिस ठाणेंतर्गत असणारी वडोली भिकेश्वर, धनकवडी, यशवंतनगर (सह्याद्री कारखाना), शिरवडे या गावांचा समावेश आता मसूर पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यासाठी वाहने सध्या मंजूर असलेल्या वाहनांमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

..तर जिल्ह्यांतर्गत फिरताच येणार नाही; शासनाकडून E-pass सक्तीचा!

शासनाच्या गृह विभागाकडून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने मसूरच्या नवीन पोलिस ठाण्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, सह्याद्रीचे संचालक लहुराज जाधव, सामाजिक कार्यकर्ते कादर पिरजादे, माजी सरपंच दिनकर शिरतोडे व प्रकाश माळी, सदस्य रमेश जाधव, विकास पाटोळे, शिकंदर शेख, कासम पटेल उपस्थित होते.

Edited By : Balkrishna Madhale