पुण्यातील युवकाचा गोळ्या झाडून खून; अवघ्या 24 तासांत पोलिसांनी लावला छडा

 Shirwal murder case
Shirwal murder case esakal
Summary

टेरिसवर रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडल्याचे दिसून आल्यानंतर हा प्रकार उघडीस आला.

खंडाळा (सातारा) : शिरवळमध्ये काल (रविवार) रात्री उशिरा आठ वाजण्याच्या सुमारास शिरवळ (फुलमळा) येथील सहामजली असणाऱ्या लेक पॅलेस अपार्टमेंटच्या टेरिसवर डोक्यात गोळ्या घालून एकाची हत्या करण्यात आली होती. मृत युवकाचं नाव संजय सुभाष पाटोळे (वय 36 रा. बिबवेवाडी, पुणे) असं असल्याचं समजतं. दरम्यान, रात्री घडलेल्या या खुनाचा तपास अवघ्या 24 तासात शिरवळ पोलिस (Shirwal Police) आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं (LCB) लावलाय. या प्रकरणी तरबेज सुतार या संशयितास अटक करण्यात आलीय.

 Shirwal murder case
Andhra Pradesh : कॅबिनेट मंत्र्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

लेक पॅलेस अपार्टमेंटच्या टेरिसवर काल एक महिला गेली असता, रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडल्याचे दिसून आल्यानंतर हा प्रकार उघडीस आला. त्यानंतर शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची कसून तपासणी केली होती. ही व्यक्ती पुण्यातील असल्याचे तपासाअंती समजले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीचा शोध घेऊन हत्या करणाऱ्या संशयिताला अटक केली. दरम्यान, मृताच्या खिशात सापडलेल्या एका हॉटेलाच्या बिलावरुन याचा तपास लागल्याची प्राथमिक माहिती सातारा जिल्हा पोलीस (Satara Police) दलातून देण्यात आली.

 Shirwal murder case
'Akhilesh Yadav औरंगजेब आहे; जो आपल्या बापाचा कधी होऊ शकला नाही, तर तो..'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com