वडूज पोक्‍सो गुन्ह्यातील फरारीस अटक; अंबरनाथातून घेतले ताब्यात

वडूज पोक्‍सो गुन्ह्यातील फरारीस अटक; अंबरनाथातून घेतले ताब्यात

वडूज (जि. सातारा) : पोक्‍सो गुन्ह्यात तब्बल एक वर्षापासून फरारी असलेल्या संशयितास अंबरनाथ (जि. ठाणे) येथून सापळा रचून मायणी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करण्यात आला. जून 2018 ते फेब्रुवारी 2019 दरम्यान तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याने फिर्यादीने डॉक्‍टरांकडे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समजले. 

त्यामुळे फिर्यादी हिने लैंगिक छळाला वैतागून संशयित लखन सकट याच्या विरोधात वडूज पोलिस ठाण्यात पोक्‍सोंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक शहाजी गोसावी करीत होते. गुन्हा दाखल झाल्यापासून सकट फरारी होता. त्याचा शोध घेऊनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलिसांना गोपनीय व्यक्तीकडून सकट याचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यानंतर मोबाईल लोकेशननुसार सापळा रचून सकट यास पोलिसांनी अंबरनाथ (जि. ठाणे) येथून ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक गोसावी, पोलिस हवालदार गणेश शिरकुळे, मकसूद शिकलगार, अर्जुन खाडे, गृहरक्षक दलाचे जवान वैभव देशमुख यांनी केली. अधिक तपास गोसावी करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com