'काेराेना'ची काय आम्हांला भीती! मतदानाच्या जाेशात साेशल डिस्टन्सचा फज्जा

'काेराेना'ची काय आम्हांला भीती! मतदानाच्या जाेशात साेशल डिस्टन्सचा फज्जा

लोणंद (जि. सातारा) : खंडाळा तालुक्‍यात 63 पैकी 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. येथील 138 मतदान केंद्रांवर 66 हजार 370 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. खेड बुद्रुक (ता. खंडाळा) येथे मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. मतदान प्रक्रियेवर आमचे लक्ष आहे.  मतदान केंद्रावर सुरक्षतेचीही काळजी घेतल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी दशरथ काळे यांनी दिली.

खंडाळा तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. त्यामध्ये पळशी, कराडवाडी, वाण्याचीवाडी, लिंबाचीवाडी, हरळी, कान्हवडी, घाडगेवाडी या सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. विविध ग्रामपंचायतींत 131 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

क्रीडा संकूलाचे कुलूप ताेडले; सातारा पाेलिसांची घुसखाेरी?

उर्विरत 50 ग्रामपंचायतींच्या 330 जागासाठी 698 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशिब आजमवत आहेत. येथे 50 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून उपजिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून दोन नायब तहसीलदार, दाेन अव्वल कारकून, 17 लिपिक, 20 कोतवाल 17 तलाठी, 21 ग्रामसेवक, 21 निवडणूक निर्णय अधिकारी, 42 सहायक निवडणूक अधिकारी, 138 मतदान केंद्रावर प्रत्येकी 6 कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. त्याचबरोबर 3 पोलिस निरीक्षक, 6 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक असे अधिकारी व पोलिस कर्मचारी पोलिस बंदोबस्त आहे. 

दरम्यान खेड बुद्रुक (ता. खंडाळा) येथे मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. या केंद्रावर मतदारांनी मास्क परिधान केला असला तरी त्या ठिकाणी झालेल्या गर्दीमुळे साेशल डिस्टंसचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. मतदारांनी साेशल डिस्टंटस पाळावे असे सातत्याने पाेलिस सांगत असले तर मतदार राजा त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या ठिकाणी उन्हाचे चटके बसू नये यासाठी मतदार काळजी घेत असल्याचे सांगण्यात आले. 

केलं का मतदान? चला ना लवकर! कार्यकर्त्यांची उसळलीय गावागावांत लगीनघाई

मतदारांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान करून आपले कर्तव्य बजावावे
 - तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी दशरथ काळे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com