काय सांगता! राज्यातील 'या' गावात दुपारी दाेनपर्यंत फक्त दाेनच उमेदवारांचे मतदान

काय सांगता! राज्यातील 'या' गावात दुपारी दाेनपर्यंत फक्त दाेनच उमेदवारांचे मतदान

सातारा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमच राज्यभरातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (Gram Panchayat Election) होत आहे. आज (ता.१५) राज्यातील १४ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु झालेली आहे. आज दिवसभर राज्यभरात गावगावांत लोकशाहीचा सोहळा रंगलंय असे चित्र असले तरी सातारा जिल्ह्यातील एका गावात दुपारी दाेन वाजेपर्यंत केवळ दाेनच मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. 

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढविता येत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाड्या, पॅनेल करून गावपातळीवर निवडणूक लढवली जाते. आज १४ हजार २३४ ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु झालेली आहे. यासाठी साडेतीन लाखापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीची मतमोजणी १८ जानेवारीस होईल. 

काेराेनाची काय आम्हांला भीती! मतदानाच्या जाेशात साेशल डिस्टन्सचा फज्जा

सातारा जिल्ह्यात सकाळपासून विविध गावांमध्ये मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. जिल्ह्यातील क-हाड तालुक्यात सर्वाधिक मतदारांचा उत्साह आहे. याबराेबरच वाई, खंडाळा, पसरणी, लाेणंद, फलटण, काेळकी, जावळी, कुडाळ, पुसेगाव, खटाव या ठिकाणी मतदार राजा बाहेर पडला आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायत या बिनविराेध झाल्या असल्या तरी काही ठिकाणी एका जागेसाठी उमेदवारांची लढत आहे. 

माण (ता. तालुक्यातील) शिंदी खूर्द या गावात सात सदस्यांची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीवर सहा जण बिनविराेध निवडून आले आहेत. एका जागेवर येथे निवडणुक लागली आहे. त्यासाठी दाेन उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता दाेन्ही उमेदवारांचे मतदान झाले आहे. त्यानंतर दुपारी दाेन वाजेपर्यंत एकही मतदार मतदान केंद्रावर फिरकलेला नाही. 

वारुगड, बोथे, कळसकरवाडी परिसरात सापांचा वावर; श्रीपालवणात सर्पमित्राकडून जनजागृती

राज्यात सर्वत्र मतदानाचा उत्साह असताना या गावात मतदानासाठी मतदार केंद्रावर का येत नाहीत असा प्रश्न तेथे मतदान सुरळीत व्हावे यासाठी कार्यरत असणा-या अधिकारी, पाेलिस यांना देखील पडला आहे. दरम्यान थाेडं थांबा हाे, लवकरच कळेल मतदार मतदान केंद्रावर का आलेले नाहीत असे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

धक्के देणाऱ्या उदयनराजेंना ग्रेडसेपरेटरच्या उद्घाटनाचा बसणार धक्का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com