शतकाचा साक्षीदार मद्यपींच्या विळख्यात

Water supply scheme
Water supply schemeesakal

कऱ्हाड (सातारा) : शहराला कोयना नदीवरून (Koyna River) पाणी पुरवठा करणारी योजना (Water supply scheme) 1917 साली सुरू झाली. या केंद्रातून 2018 पर्यंत पाणी पुरवठा केला जात होता. त्यानंतर पंकज हॉटेललगतच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. तेव्हापासून शुक्रवार पेठेतील जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले असून पालिकेने व स्थानिक नगरसेवकांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने केंद्र मद्यपींच्या गांजाडूंच्या विळख्यात गेले आहे. संतापजनक बाब म्हणजे, गेल्या तीन वर्षांत लाखो रूपयांचे भंगार या केंद्रातून चोरीस गेले आहे. याची फिकीर पालिकेला (Karad Municipality) आणि नगरसेवकांना नाही. त्यामुळे येथील संतप्त रहिवासी पालिकेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.

Summary

शहराला कोयना नदीवरून (Koyna River) पाणी पुरवठा करणारी योजना (Water supply scheme) 1917 साली सुरू झाली.

शुक्रवार पेठेतील जलशुद्धीकरण केंद्र 1917 पासून कार्यान्वित करण्यात आले. या ठिकाणी ब्रिटिशकालीन इमारत असून अधिकाऱ्यांना वास्तव्यासाठी निवासस्थाने आहेत. पाण्याच्या टाक्या व पाणी स्वच्छतेची मशिनरी या ठिकाणी आहे. येथून शुक्रवार, रविवार पेठेसह काही भागास पाणी पुरवठा होत होता. नदीकाठी असणाऱ्या या केंद्रात 2018 पर्यंत पालिकेकडून कंत्राटी कर्मचारी तैनात होते. पाणी पुरवठ्यासह या केंद्रात फुलबाग या कर्मचाऱ्यांनी फुलवली होती. मात्र, हे केंद्र बंद करण्याचा निर्णय शंभराव्या वर्षातच घेण्यात आला. येथील कर्मचारी नव्या केंद्रात हलविण्यात आले. तेव्हापासून या केंद्राला घरघर लागली आहे.

दारूडे, व्यसनी लोकांनी या केंद्राच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणाचा गैरफायदा घेत येथे आपला ठिय्या केला आहे. त्यातच कोणाचेही लक्ष नसल्याने हळूहळू येथील लोखंडी साहित्य लंपास करण्यास सुरूवात केली. येथील ब्रिटिशकालीन इमारतीच्या काचा फोडण्यासह दरवाजे व साहित्याचे नुकसान करण्यात आले आहे. भरीस भर म्हणजे पालिकेने आतील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित केला आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण अंधार या परिसरात असतो. या अंधारातच व्यसनी लोकांची येजा होत असते. शहराच्या अन्य भागातून तरूण येथे रात्री व दिवसा येत असतात. याचा प्रचंड त्रास येथील रहिवासी, महिलांना होत आहे. मुळातचा हा परिसर कोयना नदीलगत असून पावसाळय़ात अनेक सर्प जलशुद्धीकरण केंद्रातून लगतच्या घरांमध्ये शिरत असल्याच्या घटना घडल्या आहेत. केंद्रात झाडी प्रचंड वाढली असून हे ठिकाण धोकादायक बनू लागले आहे.

Water supply scheme
मराठ्यांना 'ओबीसी'तूनच आरक्षण द्या, अन्यथा राज्यभर आंदोलनं

याबाबत स्थानिक नगरसेवकांकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांनी गेली तीन वर्षे याकडे दुर्लक्ष केले आहे. व्यसनी लोकांमुळे या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी येथील गैरप्रकारांबाबत पोलिसांनाही कळवण्यात आले होते. त्यांनी अचानक धाडी टाकल्यानंतर तात्पुरते हे प्रकार थांबले होते. येथील रहिवाशांनी या केंद्राचे दरवाजे पूर्णपणे बंद करून पालिकेच्या एखाद्या कर्मचाऱ्यांवर केंद्राची जबाबदारी सोपवण्याची मागणी पाणी पुरवठा विभागाकडे केली होती. विशेषत: पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱयांनी यात लक्ष घालण्याची आवश्यकता होती. मात्र, अक्षम्य दुर्लक्ष करून नागरिकांच्या पैशातून उभारलेल्या या केंद्राची नासधूस होऊ देण्याचे पातक पाणी पुरवठा विभाग करत असल्याचे दिसत आहे.

Water supply scheme
काबूल विमानतळावर उपासमारीची वेळ

महादेव मंदिराची होतेय देखभाल

या जलशुद्धीकरण केंद्रात जुने महादेव मंदिर असून या मंदिराच्या परिसराची देखभाल भाविक करत आहेत. सध्या श्रावणी सोमवार असून या मंदिरात दर्शनासाठी येणाऱया महिलांनी या केंद्राच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com