कऱ्हाड ते साताऱ्याचा प्रवास हाेणार सुखकर; महामार्गाची दुरुस्ती सुरु

कऱ्हाड ते साताऱ्याचा प्रवास हाेणार सुखकर; महामार्गाची दुरुस्ती सुरु

काशीळ (ता. सातारा) : राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालक व प्रवाशांना दिलासा मिळू लागला आहे. कऱ्हाडपासून साताऱ्यापर्यंत महामार्गावर खड्डे तसेच लेअर टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळित होत असली तरी प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.

पावसाळ्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. विशेषतः शेंद्रे येथे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. यामुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबर लहान-मोठे अपघातही होत होते. आजवर तात्पुरती डागडुजी करून वारंवार खड्डे पडत होते. मात्र, आता ज्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे, त्या ठिकाणी चांगल्या डांबराची लेअर टाकून घेण्याचे काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे. यंत्राच्या सहायाने खराब झालेला रस्त्याचा भाग काढला जात असून, त्यावर नवीन लेअर टाकली जात आहे. यामुळे रस्ता एक सारखा होत असल्याने वाहनचालक वाहन चालवताना सुखकर होणार आहे. कोरोनामुळे करण्यात आलेला लॉकडाउन पूर्णपणे शिथिल करण्यात आला आहे.

शेंद्रे ते किणी 30 गावे अपघातग्रस्त; 125 लोकांचा मृत्यू, प्राधिकरणाचे दुर्लक्ष

यामुळे महामार्गावर वाहनांची कमालीची रेलचेल होत आहे. लोकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले असून, सुट्यांच्या दिवशी महामार्गावर वाहनांची गर्दी दुपटीने वाढत आहे. त्यातच सध्या काम सुरू असल्यामुळे वाहतूक काही ठिकाणी विस्कळित होत असली तरी संबंधित विभागाकडून अपघात होऊ नये तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जात आहेत. शेंद्रे येथील काम झाले आहे. सध्या कऱ्हाड ते वळसे परिसरात काम सुरू आहे.

वाहतूकदारांनाे सावधान ! क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक कराल तर परवाना रद्द हाेईल 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com