esakal | गणेशोत्सवात कोणतीही सूट अन् परवानगी मिळणार नाही: प्रांताधिकारी उत्तम दिघे
sakal

बोलून बातमी शोधा

"गणेशोत्सवात कोणतीही सूट अन् परवानगी मिळणार नाही"

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली. त्यावेळी प्रांताधिकारी दिघे बोलत होते.

"गणेशोत्सवात कोणतीही सूट अन् परवानगी मिळणार नाही"

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा): साथरोग कायद्याचे नियम व निर्बंध कायम आहेत. सातारा जिल्हा हा तिसर्‍या अद्यापही स्टेजमध्ये आहे. त्यामुळे गणेशोत्सवात कोणतीही सूट, परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली. त्यावेळी प्रांताधिकारी दिघे बोलत होते. पोलिस अपाधिक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी आर पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके उपस्थित होते.

हेही वाचा: सातारा : पुनर्वसानातील शेतकऱ्यांना तब्बल 21 वर्षांनी मिळाली जमीन

राज्यात अनेक ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम होताना दिसत असून सभा, मेळावे, लग्नसमारंभ होत आहेत. मात्र ठराविक ठिकाणीच नियमावली निर्बंध लावले जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने लोकांच्या भावनेचा विचार करून गणेश उत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना जेथे शक्य आहे, तेथे मंडप, स्पीकर व लाइटिंग यासाठी तसेच गणेश आगमनासाठी सनई, बँड वादनाला परवानगी द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक विनाय पावसकर यांनी केली. निर्बंध, लावताना प्रशासनाने यावर्षी काहीसा विचार करायला हवा होता.

हेही वाचा: सातारा जिल्ह्यातील 783 कंत्राटी कर्मचाऱ्यांची गेली नोकरी

गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारची परवानगी मिळणार नसल्याचे प्रांताधिकारी दिघे यांनी स्पष्ट केले. त्यांनी कोरोना नियमावली व निर्बंधाचे पालन करावे, असे आवाहनही केले. पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील म्हणाले, कोरोनाचा प्रसार अद्याप कमी झालेला नाही. गतवर्षापप्रमाणेच याही वर्षी गणेशोत्सव शांततेत साजरा करावा लागेल. नियमावलीचे व निर्बंधाचे पालन करूनच आपणाला गणेशोत्सव साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर मंडप, देखावा करण्यास मनाई आहे. गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुकीशिवाय होणार आहे. यावेळी नगरसेवक विजय वाटेगावकर, सौरभ पाटील, फारूक पटवेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. रत्नाकर शानबाग यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आभार मानले.

हेही वाचा: सातारा: जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात बिबट्या

वाहतूक कोंडी मार्गी लावा

कृष्णा कॅनाॅल ते ओगलेवाडीच्या रस्त्याचे काम सुरू आहे. तेथे उत्सव काळात मूर्ती आणताना गर्दी होते. त्यामुळे त्या मार्गावर वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावावा , अशी मागणी हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव यांनी केली.

loading image
go to top