esakal | शरद पवारांशी चर्चेनंतरच व्यवस्थापनाने आम्हांस 'प्रतापगड' साेपविलाचा संचालक मंडळास पडला विसर!

बोलून बातमी शोधा

शरद पवारांशी चर्चेनंतरच व्यवस्थापनाने आम्हांस 'प्रतापगड' साेपविलाचा संचालक मंडळास पडला विसर!}

हे वागणे लालसिंगरावकाकांच्या वारसांना शोभणारे नाही. काही गोष्टी आम्ही बोलत नाही, याचा गैरअर्थ आरोप करणाऱ्यांनी काढू नये, बोलण्यास भाग पाडू नये, असा समजवजा इशाराही सौरभ शिंदे यांना चंद्रसेन शिंदे यांनी पत्रकात दिला आहे.

शरद पवारांशी चर्चेनंतरच व्यवस्थापनाने आम्हांस 'प्रतापगड' साेपविलाचा संचालक मंडळास पडला विसर!
sakal_logo
By
विलास साळूंखे

भुईंज (जि. सातारा) : सोनगाव येथील प्रतापगड कारखाना चालविण्यास घेण्यात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ किंवा धंदेवाईक उद्देश नव्हता. शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्थेचा गळा घोटून ती संस्था कोणीतरी स्वतःच्या मांडीखाली दाबण्याचा प्रयत्न होत असल्यानेच परिणामांची पर्वा न करता तो कारखाना किसन वीर परिवाराने चालविण्यास घेतला. ती मदत विसरून प्रतापगडच्या संचालकांनी सभासदांची दिशाभूल करणारी वक्‍तव्ये सुरू केल्याची प्रतिक्रिया किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रसेन शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली. याच पत्रकात अधिकार आहे म्हणून काहीही आरोप न करण्याचा सल्ला देत हे वागणे लालसिंगरावकाकांच्या वारसांना न शोभणारे असल्याचे मतही शिंदे यांनी व्यक्‍त केले आहे. 

प्रतापगडचे संचालक सौरभ शिंदे यांच्या वक्‍तव्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रसेन शिंदे म्हणाले, ""किसन वीर कारखाना एकट्याच्या बळावर एफआरपीपेक्षा काही कोटींची जादा रक्कम देण्याचा विक्रम करीत होता. त्याच वेळी कार्यक्षेत्रातीलच शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना लिलावात निघतोय म्हटल्यावर तो शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा, या हेतूने यासाठीचे प्रयत्न सुरू केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चेनंतर तेथील व्यवस्थापनाने प्रतापगड 16 वर्षांच्या कराराने किसन वीरकडे सोपवला. यामुळे खासगी होणारा प्रतापगड कारखाना सहकारात टिकला. अनेक अडचणींवर मात करत सलग पाच हंगाम किसन वीरने यशस्वी केले.'' यंदा कारखाना सुरू करण्याची तयारी होती. मात्र, काही जणांच्या असहकार्यामुळे गव्हाणीत मोळी पडली नसल्याचा आरोपही चंद्रसेन शिंदेंनी केला आहे. 

शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाचा ठरलं

सलग तीन वर्षे कारखाना बंद असल्याचे विधान करणाऱ्यांना कराराप्रमाणे किसन वीरने प्रतापगडची 49.24 कोटींची देणी फेडल्याचा विसर पडला आहे. आमच्या कार्यकाळात प्रतापगडच्या कामगारांच्या पगारात वाढ झाली असून, प्रतापगडची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अशी बेताल वक्‍तव्ये होत असल्याचेही शिंदे यांनी पत्रकात नमूद केले आहे. मिरवण्यापेक्षा कारखान्यावर असणारी शेतकऱ्यांची मालकी कायम राहावी, यासाठी किसन वीर परिवारने नेहमी प्रयत्न केले. शेतकऱ्यांची मालकी टिकल्यानेच सौरभ शिंदे यांना बोलण्याचा अधिकार मिळाला आहे. अधिकार आहे म्हणून कोणी काहीही आरोप करू नयेत. हे वागणे लालसिंगरावकाकांच्या वारसांना शोभणारे नाही. काही गोष्टी आम्ही बोलत नाही, याचा गैरअर्थ आरोप करणाऱ्यांनी काढू नये, बोलण्यास भाग पाडू नये, असा समजवजा इशाराही सौरभ शिंदे यांना चंद्रसेन शिंदे यांनी पत्रकात दिला आहे.

साताऱ्याच्या पोरानं जिंकलं दिल्लीचं तख्त; यूपीएससीत प्रथमेश देशात तिसरा, तर महाराष्ट्रात पहिला!

साताऱ्याच्या सुपुत्रांचा सेना पदकाने सन्मान; देशात उंचावली जिल्ह्याची मान!

Edited By : Siddharth Latkar