चारुदत्त आफळेंना वीर जीवा महाले पुरस्कार जाहीर

चारुदत्त आफळेंना वीर जीवा महाले पुरस्कार जाहीर

वाई (जि. सातारा) :  येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने शिवप्रताप दिनानिमित्त देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळे (पुणे) यांना या वर्षीचा "वीर जिवा महाले' पुरस्कार, तर अभिवक्ता पंताजीकाका बोकील पुरस्कार गोरक्षक ऍड. कपिल राठोड (पुणे) यांना देण्यात येणार आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरण कार्यक्रम अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध केला. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून, तसेच वाईनगरीचा अफजलखानाच्या विळख्यातून मुक्त केल्याबद्दल समितीच्या वतीने मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

उपमुख्यमंत्र्यांच्या भुमिकेमुळे सातारा जिल्हा बॅंकेच्या विद्यमान संचालकांसह नव्यांना दिलासा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार शिवप्रताप दिनी पुरस्कार वितरण न करता 15 मे 2021 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होईल. या वेळी शिवव्याख्याते हभप राकेश पिंजण (उरळी देवाची) यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वेळी शाहीर शरद यादव (दरेवाडी- बावधन) यांचा अफजलखान वधाचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार असल्याचे समितीने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com