esakal | सद्यस्थितीत दंतकथा वाटेल असे कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षाने घडविले : पृथ्वीराज चव्हाण

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan
सद्यस्थितीत दंतकथा वाटेल असे कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षाने घडविले : पृथ्वीराज चव्हाण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुईंज (सातारा) : सध्याच्या राजकीय परिस्थितीत दंतकथा वाटेल असे कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षाने घडविले त्यात नारायणराव पवार अग्रणी होते, अशी भावना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

चिंधवली (ता. वाई) येथील कृष्णा नदीवरील पुलाची पाहणी श्री. चव्हाण यांनी केल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष (कै.) नारायणराव पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबीयांशी झालेल्या कौटुंबिक सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. ही भेट व्यक्तिगत व स्नेहपूर्ण असल्याने श्री. चव्हाण यांच्यासमवेत मनोहर शिंदे, बाबासाहेब कदम, राहुल शिंदे एवढेच मोजके कॉंग्रेस पदाधिकारी होते.

क्रेडिट कार्डवर कर्ज घेताय? मग 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठे नुकसान

श्री. चव्हाण यांनी सर्वांची आपुलकीने चौकशी करत केंद्रीय मंत्री असताना अण्णांच्या अमृतमहोत्सवाला चिंधवलीत आल्याची तसेच अण्णा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांच्या गाडीत बसून कार्यक्रमांना गेल्याच्या आठवणी सांगितल्या. चिंधवलीचे माजी सरपंच पैलवान जयवंत पवार, रमेश पवार यांच्याकडून त्यांच्या शेती व मत्स्यशेती व्यवसायाची माहिती घेऊन शेतीत रात्रंदिवस स्वतः राबणाऱ्या या सर्वांचे कौतुक केले. या वेळी चिंधवलीचे माजी उपसरपंच नारायण इथापे, राजेंद्र इथापे, चंद्रशेखर पवार आदी उपस्थित होते.

Edited By : Balkrishna Madhale