काँग्रेस पक्ष कुशल संघटकाला मुकला; चव्हाणांनी पटेलांना वाहिली श्रद्धांजली

काँग्रेस पक्ष कुशल संघटकाला मुकला; चव्हाणांनी पटेलांना वाहिली श्रद्धांजली

कऱ्हाड (जि. सातारा) : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमदजी पटेल यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष कुशल संघटकाला मुकला आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिल्यानंतर श्री. चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना श्री. पटेल यांना श्रद्धांजली वाहिली. आमदार चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षाचे अत्यंत कुशल संघटक, मुत्सुद्दी व प्रभावशाली नेते होते. अहमद आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. दोघे संसदेत व काँग्रेस पक्षामध्ये सहकारी म्हणून कार्यरत होतो. त्यांच्या सोबतचे अनेक क्षण माझ्या डोळ्यासमोर आहेत. अत्यंत प्रगल्भ विचारांचे मुत्सुद्दी नेते आपल्यात नाहीत हेच न पटणारे आहे. 

त्यांनी अनेक तरुणांना राजकारणात येण्यासाठी मार्गदर्शन केले. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचे अन्य पक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com