कुकुडवाड परिसरात मोबाईल रेंजचे तीन-तेरा; 'असून अडचण, नसून खोळंबा' स्थिती!

कुकुडवाड परिसरात मोबाईल रेंजचे तीन-तेरा; 'असून अडचण, नसून खोळंबा' स्थिती!

कुकुडवाड (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील कुकुडवाड, वळई, विरळी, जांभुळणी, पाणवन, वडजल आदी गावांत मोबाईल नेटवर्कचे सतत तीन-तेरा वाजत असल्याने ग्राहकांची "असून अडचण, नसून खोळंबा' अशी अवस्था झाली आहे. मोबाईल हॅंडसेट "शोपीस'ठरू लागले आहेत. 

आजच्या काळात मोबाईल ही अत्यावश्‍यक बाब झालेली असल्याने मोबाईलशिवाय राहवले जात नाही. मोबाईलमुळे जग जवळ आले आहे. आज सर्वच व्यवहार ऑनलाइन झालेले असले तरी कमी अधिक रेंजमुळे ग्रामीण भागातील ग्राहक मात्र त्रस्त झाले आहेत. सध्या शाळा, कॉलेज बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु, रेंज राहत नसल्याने शिक्षणातही सतत व्यत्यय येत आहे. सुरवातीच्या काळामध्ये भरपूर रेंज असते. मात्र, हळूहळू ती कमी कमी होत जाते. असे का होते, हा संशोधनाचा विषय आहे. कंपन्या खर्च कमी करण्यासाठी रेंज कमी करून उपद्‌व्याप करत असल्याचे समजते, पण याचा फटका ग्राहकांना बसतो.

दरम्यान, मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून सर्रास शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केलेले आहे. ग्रामीण भागातील अनेक पालकांची परिस्थिती नसताना त्यांनी आपल्या पाल्यांसाठी महागडे स्मार्ट फोन विकत घतलेले आहेत. मात्र, ग्रामीण भागात मोबाईल रेंज राहत नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. 

माझ्या गावात सर्वच मोबाईल कंपनीचे कार्डधारक आहेत. सुरवातीस या सर्व कंपन्यांचे नेटवर्क चांगले होते. पण, हळूहळू ते कमी कमी होत असल्यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. परिणामी ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. याबाबत मी कंपनीच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार पण दिली आहे. पण, कोणताही बदल होत नाही असे, विरळी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत गोरड यांनी सांगितले.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com