खंबाटकी घाटात दोन तासांपासून Traffic Jam; रस्त्यावर लांबलचक रांगा

Khambatki Ghat
Khambatki Ghatesakal
Summary

खंबाटकी घाटात सकाळी साडेअकरा वाजल्यापासून वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.

खंडाळा (सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) खंबाटकी घाटात दोन लेन असणाऱ्या सहाव्या वळणावर रस्त्याचे काम सुरु असल्याने सकाळी साडेअकरा वाजल्यापासून वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मार्गावर नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ पहायला मिळतेय.

घाट रुंदीकरणात खंडाळ्यातील खामजाई मंदिर परिसरात केवळ दोनच लेनचे काम झाल्याने येथे वाहनांना धिम्या गतीनेच जावे लागते. आज महामार्गावरील रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाल्याने एकच लेन सुरु ठेवण्यात आली. परिणामी, वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक.नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Khambatki Ghat
'संसार उद्ध्वस्त करणाऱ्या सोमय्यांवर कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करू'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com