वीजपंपांची चोरी करणारी टोळी पुसेगावात गजाआड; तिघांना अटक

वीजपंपांची चोरी करणारी टोळी पुसेगावात गजाआड; तिघांना अटक

पुसेगाव (जि. सातारा) : डिस्कळ (ता. खटाव) परिसरातील विहिरी व बोअरवेलमधील वीजपंपांची चोरी करणाऱ्या तीन संशयितांना गजाआड करण्यात पुसेगाव पोलिसांनी यश मिळाले. त्यांच्याकडून पाच अश्वशक्तीचा एक वीजपंप, तीन अश्वशक्तीचे दोन वीजपंप व बोअरवेलच्या पाण्यातील एक वीजपंप असा एकूण 33 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

डिस्कळ परिसरात विहिरी व बोअरवेलमधील वीजपंपाच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पुसेगाव पोलिस ठाण्यात त्याबाबतच्या तक्रारी दाखल होत्या. पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी या चोरीच्या तपासासाठी पथके नेमून शोध मोहीम राबविली. 

गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून पथकाने करण दगडू जाधव, गणेश ऊर्फ बोंग्या अशोक मदने व विकास लक्ष्मण आडके (सर्व रा. डिस्कळ) यांना ताब्यात घेतला. या तिन्ही संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, सहायक फौजदार जगताप, हवालदार चंद्रहार खाडे, आनंदा गंबरे, सुधाकर भोसले, पोलिस नाईक सचिन माने, विजय खाडे, शिवाजी माने, मंगेश डोंबे, सचिन जगताप, पुष्कर जाधव, ज्ञानेश्वर यादव यांनी तपासात भाग घेतला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com