esakal | ब्रेकिंग : जाणुन घ्या, कोयना धरणातून केव्हा साेडले जाणार पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग : जाणुन घ्या, कोयना धरणातून केव्हा साेडले जाणार पाणी

काेयना धरणात आज (गुरवार) संध्याकाळी सहा वाजता 67.27 टीएमसी पाणीसाठा आहे.

ब्रेकिंग : जाणुन घ्या, कोयना धरणातून केव्हा साेडले जाणार पाणी

sakal_logo
By
विजय लाड

काेयनानगर (जि.सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत कोयनेच्या पाणीसाठ्यात तीन टीएमसीने वाढ झाली. धरणाचा पाणी साठा 66.2 टीएमसीपर्यंत गेला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 81 हजार 045 क्‍युसेक्‍स आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठयात झपाट्याने वाढ होत आहे.
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

पाणलोट क्षेत्रातील कोयनानगरला 202, नवजात 245, महाबळेश्वरला 185, तर वलवणला 178 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, नवजा, कोयना व वलवण येथे पावसाची संततधार कायम आहे.

पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम, सातारा जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा 50 टक्य्यांनी वाढला

दरम्यान काेयना धरणात आज (गुरवार) संध्याकाळी सहा वाजता 67.27 टीएमसी पाणीसाठा आहे. धरण परिचलन सूची नुसार कोयना धरणातील पाणी साठा 80 टीएमसी वर गेले नंतरच धरणातून कोयना नदीत पुराचा विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती कार्यकारी अभियंता ,
कोयना सिंचन विभागाचे कुमार पाटील यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

आयएएस डॉ. अश्विनी वाकडेंच्या भावाला 'ती' गाेष्ट खटकली हाेती

लोककलावंत म्हणतात मानधन दिले, जगणे मुश्‍किल!

loading image
go to top