कोयना धरणात सलग दुसऱ्या दिवशी दाेन टीएमसीची भर

कोयना धरणात सलग दुसऱ्या दिवशी दाेन टीएमसीची भर

कोयनानगरः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर पावसाची संततधार कायम असल्याने भरतीकडे प्रयाण केलेल्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना धरणात 38.22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायमच असून, यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 22 हजार 956 क्‍युसेक झाली आहे.
तुमचा घात करण्याआधी...

चोवीस तासांत पाणलोट क्षेत्रातील कोयनानगरला 106, नवजात 68 व महाबळेश्वर येथे 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (बुधवार) दिवसभर पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायमच आहे. कोयनानगर येथे 70/1223, नवजा 75/1196, तर महाबळेश्वरला 80/1204 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासांत दोन टीएमसी वाढ झाली आहे. धरणाची जलपातळी 2091.1 फूट झाली असून, धरणात 38.22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी वाचा; अन्यथा तुमच्यावरही हाेऊ शकते कारवाई

महत्त्‍वाचे... अगदी गरज असेल तरच बॅंकांमध्ये जा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com