..अखेर झोडपणाऱ्या पावसाने घेतली उसंत!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

संपूर्ण जिल्ह्यात गेल्या शनिवारपासून परतीचा पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. या पावसाचा जोर पूर्वेकडे अधिक असल्याने दुष्काळी भागातील माणगंगा आणि बाणगंगा या नद्यांना पूर आला होता. मात्र, आज (रविवार) पावसाने उघडीप देत दुपारच्या सुमारास उन्हाची किरणे पडल्याचे चित्र होते.

सातारा : जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून सुरु असलेला परतीचा पाऊस आज (रविवार) ओसरल्याचे दिसून आले. संपूर्ण राज्यासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपल्याने दुष्काळी भागातील नद्या भरुन वाहत होत्या. मात्र, आज पावसाने उघडीप देत दुपारच्या सुमारास उन्हाची किरणे पडल्याचे चित्र होते. 

संपूर्ण जिल्ह्यात गेल्या शनिवारपासून परतीचा पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. या पावसाचा जोर पूर्वेकडे अधिक असल्याने दुष्काळी भागातील माणगंगा आणि बाणगंगा या नद्यांना पूर आला होता. याचबरोबर तलाव, ओढे-नाले पाण्याने भरुन वाहू लागले होते. त्यातच शेतकऱ्यांचा सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्यात आला असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कित्येक शेतकऱ्यांनी सोयाबीन मळणीसाठी शेतात ढीग लावून ठेवले होते. परंतु अचानक आलेल्या पावसाने सोयाबीन भिजल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. 

काही ठिकाणी ज्वारीची नुकतीच पेरणी करण्यात आली होती, तर काही ठिकाणी कांदे, लसणाची रोपे लावण्यात आली होती. मात्र, परतीच्या अवकाळी पावसाने या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही शेतामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने उस भुईसपाट झाल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यात शुक्रवारी काही भागात पाऊस पडला होता, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. मात्र, रविवारपासून पूर्णत: पाऊस उघडला आहे. रविवारी दिवसभर सातारा शहरात उन्हाचा तडाखा जाणवत होता. 

जो बत्ती करतो गुल, तो नेता 'पावरफुल्ल'!

पावसाच्या उघडीपीनंतर बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपले होते. मात्र, घटस्थापनेच्या मुहूर्तावर पाऊस उघडला आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात पावसाने उघडीप दिल्याने रविवारी शहरातील बाजारपेठांमध्येही नागरिकांची वर्दळ वाढली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Stopped In Satara District Satara News