दमदार पावसाने माणदेशचा बळीराजा सुखावला; वाटाणा, बाजरी, मुग, घेवड्यास जीवदान

दमदार पावसाने माणदेशचा बळीराजा सुखावला; वाटाणा, बाजरी, मुग, घेवड्यास जीवदान

दहिवडी (जि.सातारा)  : धुळवाफेवर पेरणी करुन पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला दमदार पावसाने दिलासा दिला. या पावसामुळे पेरणी केलेली पिके बळ धरणार असून, नदी-नाले यंदाही खळाळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सलग दोन दिवसाच्या पावसाने माणदेश सुखावला असला तरी पाणी होण्यासाठी असाच पाऊस सलग पडण्याची आवश्‍यकता आहे.
 मराठा जात प्रमाणपत्र असे काढा  
 
सुरुवातीला काही ठिकाणी पडलेल्या हलक्‍या पावसाच्या भरवशावर माण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली होती. काही भाग पेरणीपासून अजूनही वंचित होता. मात्र, पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. शेतकरी पाऊस पडण्याची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, पाऊस हुलकावणी देत होता. गुरुवारी माण तालुक्‍यातील बहुतांशी भागात दमदार पावसाचे आगमन झाले. पश्‍चिमेकडच्या बोथेपासून पुर्वेकडील कारखेलपर्यंत पाऊस पडला. दुपारी साधारण चारच्या सुमारास काही ठिकाणी पावसाने सुरवात केली. बोथे, कुळकजाई, मार्डी, भाटकी, कारखेल यासह विविध ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. भाटकी येथे मुसळधार पाऊस झाला.
 
आज (शुक्रवारी) पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. मलवडी परिसर, मोगराळे परिसर याठिकाणी मोठा पाऊस झाला. या पावसाने वाटाणा, बाजरी, मुग, घेवडा यांना जीवदान मिळाले आहे. ज्यांच्या पेरण्या झाल्या नव्हत्या. त्या शेतकऱ्यांना पेरणीयोग्य वातावरण तयार झाले आहे. हा पाऊस दिलासा देणारा असला तरी पाणी होण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणात व सलग पावसाची आवश्‍यकता आहे.

काॅलेजचा हा प्रश्न साेडविण्यासाठी माणदेश एकवटला; कुणी दहा दिले तर कुणी लाख

ग्रामस्थांच्या काळजीने महाबळेश्‍वर, पाटण, जावळी तालुक्‍यात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असा पुढाकार

कोयना, कांदाटी खोऱ्यात वनविभाग व नागरिकांत वाद, हे ठरले कारण  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com