esakal | थकीत वीजबिलावरून भडका; कनेक्‍शन तोडल्यास शेतकरी संघटनांकडून होणार 'आसुडाचा प्रहार'
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

कोरोना महामारीच्या संकटाने सर्वांचे अर्थकारण बिघडून टाकले. त्यातून वीज कंपनीचीही बिले थकीत राहिली.

थकीत वीजबिलावरून भडका; कनेक्‍शन तोडल्यास शेतकरी संघटनांकडून होणार 'आसुडाचा प्रहार'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीजबिलासांठी कनेक्‍शन कट करण्यास दिलेली स्थगिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उठवली. त्यामुळे महावितरणने पुन्हा वसुलीचा धडाका सुरू केला आहे. त्याअंतर्गत वीज कनेक्‍शनही तोडण्यात येणार आहेत. त्यातच शेतकरी संघटनांनीही वीज कनेक्‍शन तोडायला आल्यास आसुडाचा प्रहार करण्यात येईल, असा इशारा देत जनतेनेच हे आंदोलन हाती घ्यावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे वीजबिल वसुलीवरून शेतकरी संघटना आणि महावितरणमध्ये आंदोलनाची ठिगणी पडण्याची शक्‍यता आहे. 

कोरोना महामारीच्या संकटाने सर्वांचे अर्थकारण बिघडून टाकले. त्यातून वीज कंपनीचीही बिले थकीत राहिली. कोरोनामुळे तीन महिने रीडिंग न घेताच सरासरीएवढी बिले देण्यात आली. वीज कंपनीने थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेली स्थगिती ऊर्जामंत्र्यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उठवली. त्यामुळे आता महावितरणला पूर्वीसारखे वीज कनेक्‍शन तोडण्याचे कोलीत हातात मिळाले आहे. त्यामुळे त्याची ढाल करून आता वसुलीसाठी महावितरणकडून जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

पुण्यात खोदकामात सापडली 1835 च्या काळातील सोन्याची नाणी; 216 नाण्यांनी उजळली साताऱ्याची तिजोरी

शेतकऱ्यांना त्यांच्याकडे थकलेले वीजबिल भरण्याबाबत आवाहन केले जात आहे. सध्या जिल्ह्यात उन्हाळी पिके, बारमाही बागायती पिके उभी आहेत. उन्हाच्या झळा वाढल्याने पिकांना पाण्याची मागणी वाढत आहे. जे शेतकरी पैशांचा भरणा करतील, त्यांचेच वीज रोहित्र सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, जे शेतकरी पैसे देणार नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरीराजाला ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच विजेअभावी भुईमूग, उन्हाळी मूग, ज्वारी, भाजीपाला पिकांवर पाणी सोडावे लागणार आहे.

Breaking News : प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडे, संग्राम घोरपडेंसह 20 जणांवर खुनाचा गुन्हा 

अगोदरच मार्चएंड त्यात... 

सध्या मार्चएंडची धामधूम सुरू आहे. त्यासाठी शेतकरी बॅंका, पतसंस्था, सोसायट्यांची घेतलेली कर्जे फिरवाफिरवी करण्याच्या कामात आहे. त्यासाठी त्यांना उसनवारी करण्याची वेळ आली आहे. त्यातच वीजबिलाची भर पडल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकटच आले आहे. मार्चएंडचा विचार करून बिले भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

तुम्हाला माहितीय? 15 व्या शतकातील चीनी कलाकृतीच्या Porcelain Bowl ची किंमत $500,000 डॉलर्स इतकी आहे!

विधानसभेत विरोधी पक्षाने आवाज उठवल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्‍शन तोडायला स्थगिती दिली. त्यानंतर ती उठवली. हा एक कोटी 25 लाख वीज ग्राहकांचा विश्वासघात आहे. दादागिरी करून वीज कनेक्‍शन तोडायचा प्रयत्न झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांना गावातून पिटाळून लावा. 

- राजू शेट्टी, माजी खासदार 

स्वीडनमध्ये 1300 वर्षांपूर्वीच्या रहस्यमय गोष्टीचा शोध; Gold Foil मध्ये दिसली मिठी मारणारी जोडपी

कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी कृषिपंपांचे वीजबिल भरू शकलेला नाही. त्यामुळे सरकारने कसल्याही परिस्थितीत वीजबिल भरण्याची सक्ती करू नये. शेतकऱ्यांची वीज तोडू देणार नाही. त्यातूनही कोणी वीज तोडण्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांकडून आसुडाचा प्रसाद मिळेल. 

-पंजाबराव पाटील, अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top