esakal | काळजी घ्या! परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे : रामराजे नाईक - निंबाळकर
sakal

बोलून बातमी शोधा

काळजी घ्या! परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे : रामराजे नाईक - निंबाळकर

फलटण संस्थानचे अधिपती आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा आज (गुढीपाडवा) वाढदिवस असून, यानिमित्त रामराजेंनी नागरिकांना भेटू शकत नसल्याची माहिती देत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

काळजी घ्या! परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे : रामराजे नाईक - निंबाळकर

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : देशात, राज्यात काेराेनाचे रुग्ण वाढत आहेत. दिवसेंदिवस सातारा जिल्ह्यात देखील काेराेनाचे रुग्ण वाढत आहेत. तुमच्या सर्वांचे आराेग्य ठणठणीत राहाे, या संकटकाळात वाढदिवस साजरा करणे हे उचित ठरणार नाही. आपण सर्वांनी मास्क वापरावा, साेशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि सुरक्षित राहावे, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा हीच माझी ताकद असल्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी नमूद केले.

फलटण संस्थानचे अधिपती आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा आज (गुढीपाडवा) वाढदिवस असून, यानिमित्त रामराजेंनी नागरिकांना भेटू शकत नसल्याची माहिती देत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, हीच माझी ताकद असून, काेविड 19 च्या संकटात आपण सुरक्षित रहा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे आवाहन केले आहे.

याबराेबरच शासन नियमांचे पालन करुन नागरिकांनी लवकरात लवकर लस घ्यावी. कोविड-19 या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. फलटण तालुक्‍यात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर मी प्रशासनाला सूचना दिल्यानुसार पालिकेच्या सांस्कृतिक भवन येथील नवीन इमारतीत नव्याने शंभर बेडचे रुग्णालय तात्काळ उभे करण्यात आले आहे. या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास आपण या महामारीचा मुकाबला यशस्वीपणे करू शकतो असे रामराजेंनी नमूद केले. 

सातारकरांनाे! लस घेण्यासाठी सिव्हीलला निघालात? थांबा, हे वाचा

सण साध्या पद्धतीने साजरा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

जिवलग मित्रासाठी एकवटले मैत्रीचे जग; Whatsappच्या माध्यमातून गोळा केला तब्बल अडीच लाखांचा निधी

काेणत्याही क्षणी लाकडाउनचा निर्णय झाल्यास परिस्थिती हाताळण्यास आम्ही सज्ज आहाेत