रेशन दुकानदारांचे प्रशासनाकडे अडकले तब्बल दहा कोट रुपये! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेशन दुकानदारांचे प्रशासनाकडे अडकले तब्बल दहा कोट रुपये!

रेशन आले नाही म्हणून दुकानदारांना ग्राहक सतावू लागले. वादविवाद होऊ लागले. ऑगस्ट गेला, सप्टेंबरचा अर्धा महिना गेला तरीही केशरी कार्ड धारकांचे धान्य ही नाही आणि भरलेले पैसे ही परत नाहीत. जून महिन्यापर्यंत हे वाटप व्यवस्थित होत होते. जुलै महिन्याचे वाटप करण्यासाठी सातारा तालुक्यातील दुकानदारांनी कर्ज काढून रेशन आणायला पैसे भरले. पण, जुलै महिन्यात धान्य आले नाही.

रेशन दुकानदारांचे प्रशासनाकडे अडकले तब्बल दहा कोट रुपये!

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : कोरोनाचा फटका सातारा तालुक्यातील रेशन दुकानदारांना बसला आहे. दुकानदारांनी बिकट अवस्थेत कर्ज काढून रेशन वाटप करण्यासाठी जून महिन्यात पैसे भरले. पण, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिने धान्यच आले नाही. त्यामुळे एका बाजूला ग्राहक रेशन मिळाले नाही म्हणून तर इकडे पैसे ही नाही आणि धान्य ही नाही अशा अवस्थेत सातारा तालुक्यातील रेशन धान्य दुकानदार सापडले आहेत.

तब्बल २१० रेशन दुकानदारांचे १० कोट रुपये शासनाकडे अडकले आहेत. रेशन दुकानदार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राज्य शासनाने केसरी कार्ड धारकांना ८ रुपये किलो गहू, १२ रुपये किलो तांदूळ प्रति माणसी ३ व २ किलो प्रमाणे वाटप केले जात होते. जून महिन्यापर्यंत हे वाटप व्यवस्थित होत होते. जुलै महिन्याच्या वाटप करण्यासाठी सातारा तालुक्यातील दुकानदारांनी कर्ज काढून रेशन आणायला पैसे भरले. दि. २० जूनला शासनाच्या तिजोरीत पैसे भरले, पण जुलै महिन्यात धान्य आले नाही. 

स्वाभिमानीनं भररस्त्यात फाडलं केंद्र सरकारचं विधेयक!

रेशन आले नाही म्हणून दुकानदारांना ग्राहक सतावू लागले. वादविवाद होऊ लागले. ऑगस्ट गेला, सप्टेंबरचा अर्धा महिना गेला तरीही केशरी कार्ड धारकांचे धान्य ही नाही आणि भरलेले पैसे ही परत नाहीत. २१० रेशन दुकानदारांचे १० कोट रुपये अडकले आहेत. त्यामुळे रेशन दुकानदार कोंडीत अडकले आहेत.

Video : महाबळेश्वरमध्ये दाटली धुक्याची दुलई! 

दुकानदारांना कोणतीही सुविधा दिली गेली नाही. सॅनिटायझर, मास्क नाहीत. ग्राहकांचा रेशन घेताना पोझ मशीनवर अंगठा घेतला तर दुसरा ग्राहक रेशन दुकानदारांना ओरडतो. ७० दुकानदारांना कोरोना झाला आहे. त्यातील काहीजण बरे झाले आहेत. काहीजण उपचार घेत आहेत. जे मोफत धान्य वाटले, त्याचे कमिशन ही दुकानदारांना दिले नाही. आमचे पैसे तरी परत द्या किंवा रेशनचे धान्य वाटप करण्यासाठी द्या, अशी मागणी आम्ही रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने केली आहे.

-श्रीकांत शेटे, अध्यक्ष सातारा तालुका दुकानदार संघटना

loading image
go to top