सातारा : आरटीईसाठी २२७ शाळांची नोंदणी

जिल्ह्यात एक हजार २७ विद्यार्थ्यांनी भरले ऑनलाइन अर्ज
RTE
RTEsakal

सातारा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्ह्यात ऑनलाइन अर्ज भरण्यास २५ फेब्रुवारीपासून सुरवात झाली आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यात २२७ शाळांची नोंदणी झाली असून, आतापर्यंत एक हजार २७ विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुला-मुलींसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत राखीव जागांवर प्रवेश दिले जातात. दरवर्षी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होते. मात्र, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात खासगी शाळांनी नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ केल्याने प्रवेश प्रक्रियेला उशिरा सुरवात झाली आहे. या कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे लागत असल्याने शाळा नेहमीच संधी शोधत असतात. दरम्यान, शाळांनी नोंदणी न केल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत एक फेब्रुवारीऐवजी १६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात अर्ज भरण्यास जिल्ह्यात २५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात आरटीई अंतर्गत एकूण २२७ शाळांची नोंदणी असून, एक हजार ९३१ जागा भरण्यात येणार आहेत. त्यातील सद्य:स्थितीत एक हजार २७ विद्यार्थ्यांच्या अर्जाची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत सात मार्चपर्यंत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. तसेच मध्यंतरी काही महिने प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. यंदा काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

जिल्ह्यातील चालू शैक्षणिक वर्षात आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून सात मार्चपर्यंत मुदत आहे. त्यानंतर आरटीअंतर्गत प्रवेशासाठी पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.

- शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com