esakal | Republic Day 2021 : शासनाचे पाठबळ, प्रशासनाचे धैर्य, सातारकरांच्या संयमामुळेच करुन दाखवलं : बाऴासाहेब पाटील

बोलून बातमी शोधा

Republic Day 2021 : शासनाचे पाठबळ, प्रशासनाचे धैर्य, सातारकरांच्या संयमामुळेच करुन दाखवलं : बाऴासाहेब पाटील}

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील आठवडी बाजारांमध्ये कलापथकाद्वारे कोरोना संसर्ग विषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज लोककलारंग संस्थेमार्फत कार्यक्रम सादर करण्यात आला.

Republic Day 2021 : शासनाचे पाठबळ, प्रशासनाचे धैर्य, सातारकरांच्या संयमामुळेच करुन दाखवलं : बाऴासाहेब पाटील
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : शासनाने  राज्याचा अधिकाधिक विकास  करण्यावर भर दिला आहे. या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी  मी कटीबद्ध असून जिल्ह्याच्या समातोल विकासावर भर राहणार आहे, अशी ग्वाही देवून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर परेड कमांड बाळसाहेब आलदारयांच्या नेतृतवाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले,  जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी  यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर आरोग्य सुविधा देण्यावर भर दिला आहे. त्यानुसार राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज संग्राहलयात कोविड हॉस्पीटल उभारण्यासाठी मान्यता देवून सर्व ते सहकार्य केले. या हॉस्पीटलमध्ये 234 ऑक्सीजन बेड व 52 आयसीयु बेड आहेत. डायलिसीस असणाऱ्या रुग्णांना रुग्णालये घेत नाहीत अशा रुग्णांसाठीही 4 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. बांधकाम व विद्युत सुविधेसाठी 5 कोटी 92 लाख 70 हजार, वैद्यकीय उपकरणांसाठी रु. 6 कोटी 84 लाख 97 हजार 2061 रुपये तर मनुष्यबळ व इतर गोष्टींसाठी 6 महिन्यांसाठी 13 कोटी 99 लाख 32 हजार इतका खर्च करण्यात आला आहे.
 
देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ 16 जानेवारी 2021 रोजी झाला. पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य संस्था अंतर्गत कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभाग, सैन्य दल, हवाई दल व तिसऱ्या टप्प्यात सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस जिल्ह्यात 26 आज अखेर 14 ठिकाणी देण्यात येत होती तर 27 जानेवारी पासून दोन ठिकाणी वाढविण्यात येणार आहे, म्हणजे उद्या पासून जिल्ह्यात एकूण 16 ठिकाणाहून  लस देण्यात येणार आहे. असे असले तरी शेवटच्या माणसापर्यंत लस पोहचायला वेळ लागणार आहे  तरी नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व हात वेळोळवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे.

लॉकडाऊन मुळे अनकांचे रोजगाराचे स्त्रोत बंद झाले. पण शासनाने शिधापत्रिका धारकांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला. शिवभोजन थाळी योजना सद्यस्थितीत जिल्हास्तरावर 4 केंद्रे व तालुकास्तरावर 24 असे एकूण 28 केंद्रावर ही योजना कार्यान्वीत आहे. योजना सुरु झाल्यापासून म्हणजेच 25 जानेवारी 2021 पर्यंत अंदाजे 6 लाख 55 हजार इतक्या   शिवभोजन थाळ्या वितरीत करण्यात आलेल्या आहेत. लॉकडाऊन कालावधीत ही थाळी अवघ्या 5 रुपयांमध्ये गरजुंना उपलब्ध करुन देण्यात आली.

Hows The Josh! निपाणीच्या पोरीनं जिंकलं दिल्लीचं तख्त; सुप्रियाची सैन्य दलात फिनिक्स भरारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 ही योजना 27 डिसेंबर, 2019 रोजी जाहीर करण्यात आली. या योजनंतर्गत 1 एप्रिल, 2015 ते 31 मार्च, 2019 रोजी पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. लॉकडाऊन असतानांही सहकार विभागाने ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली. या योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील 42 हजार 175 व अन्य बँकांकडील 22 हजार 921 खातेदार अपलोड करण्यात आले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील 39 हजार 380 व अन्य बँकांकडील 20 हजार 871 असे एकूण 60 हजार 251 खातेदारांची नावे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. तर 39 हजार 169 मध्यवर्ती बँकेडील व 20 हजार 97 अन्य बँकांकडील खातेदारांचे प्रमाणीकरण झालेले आहे. या प्रमाणीकरणानुसार 58 हजार 291 शेतकऱ्यांच्या खात्यावर 36 हजार 758  लाख रुपये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत रक्कम जमा झालेली आहे.

सातारा जिल्ह्याचा विचार केला असता खरीप हंगामासाठी 1600 कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टानुसार 2 लाख 58 हजार 492 शेतकऱ्यांना एकूण 1682.58 कोटी  रुपये कर्ज वाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी 105.16 इतकी आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठी कर्जवाटपाची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सन 2021- 22 या वर्षा पासून एमबीबीएस 100 जागांना महाराष्ट्र आरोग्य  विज्ञान विद्यापीठाने संलग्नतेसाठी  मान्यता दिली आहे. शासनाने आवश्यकता प्रमाणपत्रही दिले आहे. 2 डिसेंबर, 2020 रोजी नॅशनल मेडिकल आयोगा ( NMC ) कडे मान्यतेसाठीचा प्रस्ताव पाठविला आहे. सातारा येथील शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयासाठी  जानेवारी 2021 पासूनच पूर्व तयारी सुरु करण्यात येणार असून  सातारा येथील स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ. संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ गायकवाड हे पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील श्वसन रोग विभाग प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहेत.
सातारा येथे नव्याने होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अपेक्षित असलेली  जलसंपदा विभागाची  कृष्णानगर येथील 61 एकर 20 गुंठे जागा सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दि. 15 जानेवारी, 2021 च्या शासन निर्णयानुसार सातारा येथील 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे  रुग्णालय इमारत व अनुषंगिक बांधकाम करणे यासाठी रु. 495 कोटी 46 लाख इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

महाबळेश्वरपाठोपाठ कोयनाही होणार पर्यटनाचे डेस्टिनेशन; गृहराज्यमंत्र्यांचा पुढाकार

सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 1 लाख 83 हजार 431 कृषी पंप वीज ग्राहक असून त्यांच्याकडे 776.80 कोटी वीज बिलाची थकबाकी आहे. त्यापैकी निर्लेखनाद्वारे विलंब आकार व व्याजातील एकूण सूट 105.46 कोटी इतकी असून रुपये 671,34 कोटी सुधारीत थकबाकी आहे. प्रथम वर्षी 50 टक्के रक्कमेचा म्हणजे 335.67 कोटींचा  भरणा केल्यास उरलेल्या 335.67 कोटींच्या रकमेत सूट मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी वीज बिलाची वसुली संबंधित कृषीपंधारकाकडून केल्यास पंधराव्या वित्त आयोगा इतका निधी ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत काम करण्यासाठी मिळणार आहे. संबंधित ग्रामपंचायत अंतर्गत वसूल झालेल्या वीज बिलाच्या एकूण रक्कमेपैकी 33 टक्के रक्कम 110.77 कोटी  जिल्ह्यातील ग्रामपंचयतींमध्येच कृषीपंप  ग्राहकांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरला जाईल.

अख्ख जग कोविड -19 च्या विळख्यात अडकलं होतं ... आता विळखा थोडा सैल झालाय... पण धोका अजून संपलेला नाही पण मागच्या सात आठ महिन्यात शासनाने वेळोवेळी घेतलेले निर्णय, लोकांनी दाखवलेला संयम आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातले अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचं कौतुक करुन पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना गोपनीय क्षेत्रात, गडचिरोली जिल्ह्यात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय गृह मंत्री यांचे असाधारण आसूचना कुशलता पदक देवूनगौरव केला आहे. त्याचबरोबर पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनाही राष्ट्रीय सुधार सेवा पदक व प्रमाणपत्र, गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक तसेच आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा कोविड वॉरियर्स म्हणून गौरव करण्यात आला. 

Bank Of Maharashtra चा निर्णय; गृहकर्ज, वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ

कलापथकाद्वारे कोरोना संसर्गा विषयी जनजागृती

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील आठवडी बाजारांमध्ये कलापथकाद्वारे कोरोना संसर्ग विषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज लोककलारंग संस्थेमार्फत कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमा उपस्थितांनी उस्फुर्त अशी दाददिली.  जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम स्तुत्य असून यातून कोरोना संसर्गा विषयी ग्रामीण भागातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल, असा विश्वास पालकमंत्री  श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

शाळेला जाणार आम्ही! जावळी खाे-यातील विद्यार्थ्यांसह शिक्षक खूष