esakal | साताऱ्यात टोलमाफीसाठी ‘रिपब्लिकन’चे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

टोलमाफीसाठी ‘रिपब्लिकन’चे आंदोलन

साताऱ्यात टोलमाफीसाठी ‘रिपब्लिकन’चे आंदोलन

sakal_logo
By
उमेश बांबरे -सकाळ वृत्तसेवा

सातारा : राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहराजवळील आनेवाडी टोलनाका व तासवडे टोलनाक्यावर एमएच ११ व एमएच ५० या क्रमांकाच्या जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी करावी यासह इतर मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आ) आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: गृहराज्यमंत्र्यांकडून टोलनाक्यावर कोकणवासियांचे 'स्वागत'

या वेळी जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, आप्पा गायकवाड, श्रीकांत निकाळजे, वैभव गायकवाड, प्रतीक गायकवाड, आप्पा तुपे, आदित्य गायकवाड, जयवंत विरकायदे, रवींद्र बाबर, एकनाथ रोकडे, सुशील गायकवाड, संदीप जाधव, विनोद कांबळे, नीलेश गाडे, राज काकडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: सातारा : दक्षिण तांबवेत सात वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

याबाबत सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम तत्काळ पूर्ण करा, कोविड काळात आरोग्य विभागात काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तत्काळ रुजू करा, जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघात घडून नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे, संबंधित कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, पंचशीलनगर (कोडोली) येथील बौद्ध समाजातील नागरिकांची नावे सातबाऱ्यावर घ्यावीत, जुना मोटार स्टँड परिसरातील इतिहासकालीन तलावाजवळ अनधिकृत बांधकामे सुरू झाल्याने धोका निर्माण झाला आहे. याबाबत पालिकेने संबंधित कामे तत्काळ थांबविण्याची मागणी संघटनेच्या वतीने केली आहे.

loading image
go to top