साताऱ्यातील आरपीआयची निदर्शने; कामगारांसह शेतकरीविरोधी विधेयकाचा नाेंदविला निषेध

साताऱ्यातील आरपीआयची निदर्शने; कामगारांसह शेतकरीविरोधी विधेयकाचा नाेंदविला निषेध

सातारा : केंद्र सरकारने कामगार व शेतकरीविरोधी नवीन विधेयक नुकतेच संसदेत पारित केले. त्यावर राष्ट्रपतींनीही सही केली आहे. याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध नोंदवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनरल कामगार युनियचे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ व जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
 
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी व कामगारांविषयीचे नवीन विधेयक संसदेत मंजूर केले. त्यावर तातडीने राष्ट्रपतींनी सही देखील केली आहे. या विधेयकांमुळे शेतकरी व कामगारांवर अन्याय होणार आहे. तसेच कामगारांच्या हितापेक्षा केंद्राला भांडवलदारांचे हित जपण्यासाठीच केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

रेमडिसिव्हर इंजेक्‍शन्सच्या निर्णयाबाबत साताऱ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज

यापुढे कामगारांना कंत्राटी ठेवण्याचा अधिकार कंपन्यांच्या मालकांना मिळाला आहे. तसेच तीनशेच्यावरील कामगारांना मालक केव्हाही काढू शकणार आहे. त्यामुळे शेतकरी व कामगारांचे या विधेयकामुळे मोठे नुकसान होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कामगार हिताच्या कायद्याची पायमल्लीच केंद्रातील सरकारने केली आहे. याचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध करत आहोत.

काेविड 19 मृत्यूदरात देशात सातारा पाेचला तिसऱ्या क्रमांकावर
 
या आंदोलनात दादासाहेब ओव्हाळ यांच्यासमवेत जनरल कामगार युनियचे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, ब्लू फोर्सचे जिल्हाध्यक्ष किरण ओव्हाळ, सोमनाथ धोत्रे, अनिल उमाप, तालुकाध्यक्ष दीपक गाडे, शहराध्यक्ष जयवंत कांबळे, सचिन गंगावणे, राम लंकेश्‍वर, विशाल भोसले, प्रतीक गंगावणे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com