माेफत शिक्षणासाठी जावळीत केवळ एकच प्रवेश निश्चित

प्रशांत घाडगे
Friday, 30 October 2020

आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील 236 शाळांमध्ये 1657 प्रवेश निश्‍चित झाले आहेत. मात्र, एक प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर होणार असल्याने अजून काही प्रवेश वाढण्याची शक्‍यता आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.

सातारा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवर राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेशाच्या शेवटच्या दिवशी आज जिल्ह्यात एक हजार 657 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. विद्यार्थ्यासाठी अजून एक प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सांगितले आहे.
 
जिल्ह्यातील एकूण 236 शाळांमधील दोन हजार 131 जागांवरील प्रवेशासाठी दोन हजार 158 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यातील एक हजार 657 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे. प्रवेशाच्या अंतिम मुदतीपर्यंत झालेले प्रवेश पोर्टलवर नोंदविण्याचे कामकाज अद्याप सुरू आहे. त्यामुळे प्रवेश निश्‍चित झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या अजून काही प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे.

दिवाळी गोड! न्यू फलटण देणार शेतकऱ्यांना पैसे; सभापती रामराजेंची ग्वाही

17 मार्चला झालेल्या सोडतीत एकूण 1875 ऑनलाइन अर्ज आले होते. यातील 1452 प्रवेश निश्‍चित करण्यात आले होते. त्यानंतर पहिल्या प्रतीक्षा यादीत 283 अर्ज आले होते त्यातील 205 प्रवेश निश्‍चित करण्यात आले आहेत. या प्रवेश प्रक्रियेत एकूण 2158 अर्जापैकी 160 अर्ज चुकीची कागदपत्रे व इतर अडचणींमुळे बाद करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
 
आरटीईमध्ये सर्वात जास्त प्रवेश सातारा तालुक्‍यात झाले असून, सर्वात कमी जावळी तालुक्‍यात केवळ एका विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे. कऱ्हाड तालुक्‍यात 353, खंडाळा 158, खटाव 99, कोरेगाव 102, महाबळेश्‍वर 18, माण 41, पाटण 95, फलटण 177, तर वाई 130 प्रवेश निश्‍चित झाले आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील 236 शाळांमध्ये 1657 प्रवेश निश्‍चित झाले आहेत. मात्र, एक प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर होणार असल्याने अजून काही प्रवेश वाढण्याची शक्‍यता आहे असे प्रभावती कोळेकर (शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग) यांनी दिली.

खासगी क्‍लासेस संघटनेची साताऱ्यात धरणे; सात महिन्यांपासून क्‍लासेस बंद

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Right To Education Admission Process Satara News