गडकरी साहेब, महाराष्ट्रातील 'एनएचएआय'च्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना घरी पाठवा

सिद्धार्थ लाटकर | Friday, 30 October 2020

पुण्यातील सातारकरांचा पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते सातारा या रस्त्याविषयी प्रचंड राेष आहे. आता तर खूद्द पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सातारा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्धाटन करण्यात आलं. परंतु या इमारतीच्या बांधकामाला तब्बल नऊ वर्ष विलंब झाल्याने गडकरी अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. सन २०११ मध्ये या इमारतीच्या बांधकामाची निविदा निघाली मात्र दोनशे अडीचशे कोटींचे काम नऊ वर्षांनी पूर्ण झाल्यानं गडकरींनी त्यांच्या शैलीत अधिकाऱ्यांना फटकारलं.

नितीन गडकरींच्या याच मुद्द्यावरुन आता पुणे -सातारा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. याबाबत पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना ईमेलद्वारे पत्र पाठवलं आहे. या पत्रात म्हटलंय की, एनएचएआयच्या दिल्लीतील इमारतबांधणीस नऊ वर्षे लागल्याबद्दल संताप व्यक्त करुन यासाठी जबाबदार अधिकार्‍यांना घरी पाठवण्याच्या आपल्या मनोदयाचे स्वागतच, अशीच कारवाई पुणे सातारा रस्त्याचे काम दहा वर्षे रखडल्याबद्ल महाराष्ट्रातील संबंधित म्हणजे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांवरही करावी. वेलणकर यांची अधिका-यांवरील कारवाईची मागणी रास्त असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमातून उमटू लागल्या आहेत.

साखर उद्योगाला दिलासा ; इथेनॉल दरवाढीवर केंद्राची मोहोर   

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते सातारा या रस्त्याच्या कामाबाबत गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यकर्त्यांसह राजकीय मंडळींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुणे आणि सातारा जिल्हाधिकारी कार्यालयांतील बैठकांमध्ये या रस्त्याच्या दूरावस्थेबाबत चर्चा हाेत नाही असे कधीच घडले नाही. एनएचएआयचे अधिकारी बैठकांमध्ये धडाधड आश्वासन देतात. रस्ता चांगला करु, सेवा रस्ता उत्तम राहिल याची काळजी घेऊ परंतु आजतागयात प्रवाशांना सुविधा मिळाल्या आहेत असा सांगणारा एकही जण सापडत नाही. गेल्या दहा वर्षात या रस्त्यावर खूप अपघात झाले आहेत. त्यामध्ये काहींना मृत्यूमुखी पडावे लागले. या निष्पाप जीवांचा काय दाेष हाेता.

Video : सावधान! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ता खचला

पुण्यातील सातारकरांचा पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते सातारा या रस्त्याविषयी प्रचंड राेष आहे. आता तर खूद्द पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केवळ नाराजी व्यक्त केलेली नाही तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्र लिहिले आहे. सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर लिहितात गडकरी साहेब आपणसुद्धा गेल्या सहा वर्षात या कामातील दिरंगाईबद्दल तीन वेळा असंतोष प्रकट केला आहे. एनएचएआयच्या दिल्लीतील इमारत बांधणीस नऊ वर्षे लागल्याबद्दल संताप व्यक्त करुन दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांना घरी पाठवण्याचा मनोदय जाहीर केला आहे. हाच न्याय लावून अशीच कारवाई पुणे सातारा रस्त्याचे काम दहा वर्षे रखडल्याबद्ल महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवरही करून त्यांना घरी पाठवावे. दरम्यान या पुर्वीदेखील वेलणकर यांनी गडकरींना पत्र पाठवून पुणे - सातारा रस्त्याच्या दूरावस्थेबाबत प्रश्न विचारुन संबंधितांवर कारवाईची मागणी केली हाेती. 

लज्जास्पद! माण तालुक्‍यात गर्भवती महिलेला मारहाण, तीन महिलांसह सहा संशयितांवर गुन्हा