
दहिवडी : चार- पाच दिवसांपूर्वी राज्यपालांकडून औंधसह २१ गावांच्या पाणी योजनेला मान्यता मिळाली आहे आणि नव्याने ही योजना महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेसाठी आली आहे. राज्यपालांच्या मान्यतेचा या योजनेतला सगळ्यात अवघड आणि महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आम्हाला यश आलंय, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.