महाबळेश्वर अर्बन बॅंकेच्या अध्यक्षपदी सचिन धोत्रे

महाबळेश्वर अर्बन बॅंकेच्या अध्यक्षपदी सचिन धोत्रे

महाबळेश्वर : दि महाबळेश्वर अर्बन को-ऑप. बॅंकेच्या अध्यक्षपदी सचिन ऊर्फ बंडू धोत्रे तर उपाध्यक्षपदी नंदकुमार वायदंडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सहायक निबंधक जे. पी. शिंदे यांनी केली. या वेळी मावळते अध्यक्ष राजेश कुंभारदरे, माजी उपाध्यक्ष सी. डी. बावळेकर यांसह संचालक उपस्थित होते.
 
बॅंकेचे अध्यक्ष कुंभारदरे व उपाध्यक्ष बावळेकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी सहायक निबंधक जे. पी. शिंदे यांनी नुकतीच संचालकांची विशेष सभा बॅंकेच्या सभागृहात बोलावली होती.

पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार; उदयनराजेंचा इशारा  

या वेळी संचालक बाळकृष्ण कोंढाळकर, दत्तात्रय वाडकर, दिलीप रिंगे, युसुफ शेख, जावेद वलगे, बाबूराव कात्रट, इरफान शेख, संचालिका सौ. संगीता तोडकर, वृषाली डोईफोडे, अर्बन बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक राजेंद्र साळुंखे तसेच सहायक अध्यासी अधिकारी एस. पी. गरुडकर आदी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com