कार्यकर्त्यांनी आंदाेलनकाळात फाेडल्या बसच्या काचा; खाेत, शेट्टी वाई न्यायालयात हजर

कार्यकर्त्यांनी आंदाेलनकाळात फाेडल्या बसच्या काचा; खाेत, शेट्टी वाई न्यायालयात हजर

सातारा : ऊस आंदाेनावरुन पुणे बगंळूर राष्ट्रीय महामार्गावर तीन अनाेळखी व्यक्तींनी एसटी बसच्या काचा फाेडल्या हाेत्या. या प्रकरणी भुईंज पाेलिसांनी संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खाेत, राजू शेट्टी यांच्यासह पंजाबराव देशमुख व शंकर शिंदे यांच्या चिथावणीखाेर व्यक्तव्य करणे व ताेडफाेड करण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल केला हाेता. याप्रकरणी चाैकशीकामी खाेत आणि शेट्टी हे दाेन्ही नेते वाई न्यायालयात नुकतेच हजर राहिले हाेते. 

सन 2013 मध्ये ऊस दर व अन्य कारणावरुन पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदाेलन करण्यात आले हाेते. त्याचे पडसाद वाई तालुक्यातही त्यावेळी उमटले हाेते. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर त्याच कालावधीत पाचवड गावाच्या हद्दीत दुचाकीवरुन आलेल्या तीन अनाेळखी व्यक्तींनी मुंबई विभागाच्या बसवर दगडफेक करुन काचा फाेडल्या हाेत्या. याप्रकरणी भुईंज पाेलिसांनी सदाभाऊ खाेत, राजू शेट्टी, पंजबाराव देशमुख, शंकर शिंदे यांनी चिथावणीखाेर व्यक्तव्य केल्यावरुन व सांगण्यावरुन ताेडफाेड केल्याचा ठपका ठेऊन शासकीय मालमत्तेचे नुकासन केले. त्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

पुणे पदवीधर निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंपेक्षा 17 उमेदवारांना मिळाली कमी मते  

भुईंज पाेलिसांनी वाई न्यायालयात चाैघांच्या विराेधात आराेपपत्र ही दाखल केले. या गुन्ह्यात यापुर्वीच चाैघांना जामीन मंजूर झाला हाेता. गुरुवारी प्रथम न्यायदंडाधिकारी व्ही.एन.गिरवळकर यांच्या समाेर चाैघांना चाैकशीकमी हजर राहण्याच्या नाेटिसा बजावण्यात आल्या हाेत्या. त्यानूसार खाेत, शेट्टी, देशमुख व शिंदे हे न्यायालयात हजर राहिले. त्यांच्यावतीने अॅड. सागर गाढवे यांनी काम पाहिले. तसेच राजू शेट्टी यांच्यावतीने अॅड. भाेईटे यांनी काम पाहिले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com