यंदा सातारा जिल्ह्यातील २२ गावांची निवड

तलावांतील गाळ काढण्यासाठी ४४ लाखांचा निधी मिळणार; दुष्काळी भागांसाठी मोलाची भेट
Sakal relief fund 22 villages in Satara removal of silt from lakes
Sakal relief fund 22 villages in Satara removal of silt from lakessakal

सातारा : दुष्काळमुक्त महाराष्ट्र या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या माध्यमातून चाललेल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून तलावांतील गाळ काढण्यासाठी यंदा सातारा जिल्ह्यातील २२ गावांची निवड झाली आहे. जिल्ह्यातील तनिष्का गटांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या प्रस्तावांमुळे या कामांसाठी तब्बल ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील दुष्काळी भागांसाठी ही एक मोलाची भेट ठरली आहे.

राज्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी सुरवातीपासूनच सकाळ माध्यम समूह कार्यरत आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील टंचाईग्रस्त भागातील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून केले जात आहे. सकाळ

माध्यम समूहाचे महिला सक्षमीकरणासाठी तनिष्का या व्यासपीठाचे जाळे संपूर्ण राज्यभर पसरले आहे. टंचाईग्रस्त भागातील तनिष्का गटाच्या सदस्यांच्या मागणीनुसार दाखल झालेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून गावातील पाणीसाठ्यासाठी महत्त्‍वाच्या असलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो.

या उपक्रमासाठी यंदा जिल्ह्यातील तनिष्का गटांनी सकाळ रिलीफ फंडाकडे गाळ काढण्याबाबतचे प्रस्ताव दाखल केले होते. या प्रस्तावातून जिल्ह्यातील २२ गावांची निवड झाली आहे. त्यासाठी प्रत्येक गावासाठी दोन लाख याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्याला एकूण ४४ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. ग्रामपंचायतींच्या मान्यतेने प्रस्तावात सादर केलेल्या गावातील तलावाचे रुंदीकरण, खोलीकरण व गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा निधी दिला जाणार आहे.

सत्तर गावांसाठी एक कोटी ४० लाखांचा निधी

तनिष्का गटाच्या माध्यमातून तलावांतील गाळ काढण्याच्या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ७० गावांतील गाळ काढण्याचे काम सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्याला आत्तापर्यंत सुमारे एक कोटी ४० लाख रुपयांचा निधी सकाळ रिलीफ फंडाकडून देण्यात आला. त्यात आता आणखी ४२ लाखांची भर पडणार आहे.

...या गावांत होणार कामे

कोरेगाव तालुका : ल्हासुर्णे, जांब (त्रिपुटी), विखळे, फडतरवाडी. माण तालुका : पांगरखेल, जाधववाडी,

येळेवाडी, मोगराळे. जावळी तालुका : वरोशी, बिभवी,

गवडी, सायगाव, कुंभारगणी, मालुसरेवाडी, आनेवाडी, सांगवी (मेढा), गांजे, निपाणी. खटाव तालुका : पुसेगाव. सातारा तालुका : वर्णे (अभेपुरी). महाबळेश्वर तालुका : कासवंड, वाई तालुका : व्याजवाडी.

आतापर्यंत १५ कोटींहून अधिक खर्च

महाराष्ट्रात दुष्काळ मुक्तीसाठी २०१३ पासून आतापर्यंत एकूण ७५२ गावांमध्ये ‘सकाळ रिलीफ फंड’अंतर्गत १५ कोटींहून अधिक रुपये खर्च करून ओढा, नदी व तलावांतील गाळ काढून खोलीकरण करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com