नीती आयोगाकडून कऱ्हाड पालिकेचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanitary Waste Management NITI Aayog  honors Karad Municipality
नीती आयोगाकडून कऱ्हाड पालिकेचा गौरव

नीती आयोगाकडून कऱ्हाड पालिकेचा गौरव

कऱ्हाड : नगरपालिकेच्या सॅनिटरी वेस्ट मॅनेजमेंटचा नीती आयोगाकडून गौरव झाला आहे. कऱ्हाड हॉस्पिटल असोसिएशन व पालिकेच्या सहकार्याने येथे सुरू असलेल्या जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्पात शहरात घंटागाडीच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या सॅनिटरी वेस्टची विल्हेवाट लावण्यात येते. त्यासाठी पालिकेला एकही रुपयाचा खर्च येत नाही. त्याबद्दल केंद्र शासनाच्या नीती आयोगाने सॅनिटरी वेस्ट मॅनेजमेंटमधील मॉडेल सिटी म्हणून पालिकेचा सन्मान केला आहे. त्याचा व्हिडिओ ‘डाउन टू अर्थ’ पोर्टलवर दिला आहे.

हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष

कऱ्हाडला लहान-मोठी सुमारे ३०० रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमधून जैव वैद्यकीय कचरा निर्माण होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कऱ्हाड हॉस्पिटल असोसिएशनने पालिकेच्या सहकार्याने जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प बारा डबरे येथे यशस्वीपणे राबवला आहे. या कचऱ्यात सॅनिटरी वेस्टही येऊ लागले. त्यामुळे घंटागाडीत सॅनिटरी वेस्टसाठी वेगळा कप्पा आहे. प्रकल्पात १०० टक्के विघटित करण्यात येते. त्यासाठी पालिकेला एकही रुपया खर्च येत नाही. दैनंदिन १७० किलो सॅनिटरी वेस्ट जमा होते.

हेही वाचा: "राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"

केंद्र सरकारच्या नीती आयोगाने देशातील स्वच्छ शहरांचा अभ्यास करताना प्रत्येक शहराने राबवलेल्या विविध घटकांची माहिती घेतली. विविध घटकांमध्ये देशपातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची डॉक्युमेंटरी बनवली. त्यावर आपल्या मासिकात लेखही लिहिला. त्यासाठी दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्‍व्हायरमेंट या संस्थेने पाहणी केली होती. त्यातून कऱ्हाडचा सॅनिटरी वेस्ट मॅनेजमेंटमधील मॉडेल सिटी म्हणून गौरव करण्यात आला आहे. त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला असून तो ‘डाउन टू अर्थ’ या पोर्टलवर देण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्याधिकारी रमाकांत डाके, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, कऱ्हाड हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल शहा यांच्यासह महिला, शिक्षिका, विद्यार्थिनी यांच्या मुलाखती आहेत.

Web Title: Sanitary Waste Management Niti Aayog Honors Karad Municipality

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satarakarad
go to top