Crime News : 'सरपंचपद पुन्हा मागितलं, तर तुला जिवंत ठेवणार नाही'; मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा

तुम्ही सरपंचपदाचा नाद सोडा, सरपंचपद पुन्हा मागितले, तर तुला जिवंत ठेवणार नाही.
Crime News
Crime Newsesakal
Summary

या प्रकरणी सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

म्हसवड : बेकायदेशीर जमाव जमवून तुम्ही सरपंचपदाचा (Sarpanch) नाद सोडा, सरपंचपद पुन्हा मागितले, तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत एकास काठीने मारहाण केल्याप्रकरणी जांभूळणी (ता. माण) येथील सहा जणांविरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात (Mhaswad Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

यापाठोपाठच पुन्हा या घटनेत अपहरण करून मित्रास सरपंचपदाचा राजीनामा देण्यास सांग, या कारणावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणखी चौघांवर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की या घटनेतील फिर्यादी दत्तात्रय सायबू कोकरे (रा. जांभूळणी, ता. माण) हे काल सायंकाळी पाचच्या सुमारास गावातील पानटपरीनजीकच्या कट्ट्यावर बसले असताना नाथा भोजा काळेल, तानाजी सूर्यकांत काळेल, शहाजी तायाप्पा काळेल, बाबा कोंडिबा काळेल, सीताराम भगवान काळेल, तानाजी शिवाजी काळेल (सर्व रा. जांभुळणी, ता. माण) यांनी मला ‘काय रे लंगड्या तुला सरपंच व्हायचं हाय का? दुसरा कोणताही सदस्य बोलत नाही तू कशाला बोलतोस, तुम्ही सरपंचपदाचा नाद सोडा, सरपंचपद पुन्हा मागितले, तर तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून सीताराम काळेल याने मला धरले व नाथा काळेल याने त्याचे हातातील काठी माझे पाठीत मारली.

Crime News
Sangola : आमदार रवींद्र धंगेकरांचा सत्कार शरद पवारांच्या हस्ते का झाला? राजकीय चर्चांना उधाण

तेवढ्यात त्याठिकाणी असलेले इतरांनीही तुम्ही सरपंचपदाचा नाद सोडा, सरपंचपद पुन्हा मागितले, तर तुला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी दिल्याचे दत्तात्रय कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार खाडे करीत आहेत.

Crime News
Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा गळा दाबून केला खून; दगडानं ठेचला चेहरा अन् ओढणीनं..

दुसऱ्या घटनेत गाडीत जबरदस्तीने बसवून अपहरण करून तुझ्या मित्राला जांभुळणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राजीनामा द्यायला सांग. अजून त्यांनी राजीनामा दिला नाही तुला लय मस्ती आहे, असे म्हणून दत्तात्रय सायबू कोकरे यांना शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्वप्नील अशोक नरळे (रा. पानवण) व त्याच्यासोबत त्याचा एक मित्र गोसावी व इतर दोन अनोळखीविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com