राजकीय आकसापोटी पळशीची बदनामी; देवकुळेंनी साधला खाडेंवर निशाणा

राजकीय आकसापोटी पळशीची बदनामी; देवकुळेंनी साधला खाडेंवर निशाणा

दहिवडी (जि. सातारा) : पळशी (ता. माण) ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पद्धतीने व पारदर्शक करत असताना ग्रामपंचायत सदस्य नीता खाडे यांनी राजकीय स्वार्थ व आकसापोटी खोटे-नाटे आरोप करून आमच्या बरोबर गावचीही बदनामी केली. त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सरपंच शंकर देवकुळे व उपसरपंच सुनील खाडे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
 
याबाबत पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की गावातील प्रत्येक काम करताना मासिक सभेत ठराव घेऊन कामे केली आहेत. पंचवार्षिक आराखड्यातील कामे प्राधान्याने केली आहेत. कामाची बिले मंजूर करताना पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांनी मोजमाप करून कामे पूर्णत्वाचा अहवाल दिल्यानंतर मंजूर केली आहेत. 

एक लाखाच्या वरच्या खरेदीचे ई-कोटेशन, तर तीन लाखांच्या वरच्या कामाचे ई-टेंडरिंग करून कामे व खरेदी केली आहे. याबाबी कायदेशीर मार्गाने पूर्ण केल्या आहेत. सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत आहोत. गावाने मला बिनविरोध सरपंच केले असून, त्या पदाचा उपयोग गावच्या विकासासाठी करत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य नीता खाडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com