
सातारा : ‘माउली’मय बनली लोणंदनगरी
लोणंद : निरभ्र आकाशात विहरणारे ढग अन् भगव्या पताका, टाळ-मृदंगांचा अखंड निनाद आणि हजारो वारकरी करत असलेल्या अव्याहत ‘माउली, माउली’च्या जयघोषात आज संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात आगमन झाले, अन् अवघी लोणंदनगरी माउलीमय होऊन गेली. (Ashadi Wari 2022 News)
माउलींचा पालखी सोहळा हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. वारकरी सांप्रदायासह सर्वजण वारी सोहळ्याची वाट पाहतात. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे गेली दोन वर्षे हा वारी सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे सर्वांनाच वारीची आस लागली होती. माउलींच्या पादुकांच्या दर्शनाची आस लागली होती. त्यामुळे आज लोणंदनगरी भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरली होती. काल रात्री वाल्ह्यात पालख्यांचा विसावा होता. लोणंदमध्ये आज पालख्या येणार असल्याने जिल्ह्याशिवाय कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली आदींसह विविध जिल्ह्यांतील भाविक आणि छोट्या दिंड्या लोणंदमध्ये दाखल झाल्या होत्या.
राज्याच्या पश्चिम भागातील भाविक पालख्या व पादुकांच्या दर्शनासाठी लोणंदमध्ये येतात. त्यामुळे कालपासूनच लोणंद व परिसर वारकऱ्यांच्या गर्दीने भरला होता. त्यातच माउलींचा मुख्य रथ आज येणार असल्याने सुमारे पन्नास टक्के वारकऱ्यांसाठी
मदतीचे हजारो हात
वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी अनेक संस्था, व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करतात. अनेक दानशूरांनी ट्रक भरून पिण्याच्या पाण्यांच्या बाटल्या वाटल्या, कोणी फराळाचे पदार्थ, लाडू वारकऱ्यांना देत होते. वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी अन्नदानाचे छत्रही सुरू होते. वारीत वारकऱ्यांना आपली मदत व्हावी, या हेतूने अनेक संस्थांनी छोटे दवाखाने उभारले होते. प्रशासनातर्फे कोरोना लसीकरणाचीही व्यवस्था केली होती.
Web Title: Satara Ashadi Vari 2022 Mauli Mauli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..