सातारा : आटपाडी- कऱ्हाड बसवर सुर्ली घाटात दगडफेक

कर्मचाऱ्यांच्या संपाला पहिल्यांदाच गालबोट लागले आहे.
सातारा : आटपाडी- कऱ्हाड बसवर सुर्ली घाटात दगडफेक
सातारा : आटपाडी- कऱ्हाड बसवर सुर्ली घाटात दगडफेकsakal

सातारा (कऱ्हाड) ः आटपाडी आगाराच्या आटपाडी-कऱ्हाड एसटी बसवर आज दुपारी सुर्ली घाटात (ता. कऱ्हाड) घाटात अज्ञाताने आज मंगळवारी दुपारी दगडफेक केली. त्यामुळे एसटीच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपाला पहिल्यांदाच गालबोट लागले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संप सुरु आहे. त्यामुळे कऱ्हाडसह अनेक एसटी आगारातील बस बंद आहेत. मात्र संप सुरु असतानाही सांगली जिल्ह्यातील बहुतांश चालक वाहक कामावर हजर झाल्याने सांगली जिल्ह्यांतर्गत बहुतांश आगारातील एसटीबस सुरु झाल्या आहेत. आज मंगळवारी दुपारी एसटीच्या आटपाडी आगारातून निघालेल्या आटपाडी-कऱ्हाड बसवर (एमएच -14- बीटी- 3695) कडेगाव येथून पुढे आल्यानंतर असलेल्या सुर्ली घाटात दगडफेक झाली.

सातारा : आटपाडी- कऱ्हाड बसवर सुर्ली घाटात दगडफेक
लवकरच क्रिप्टो विधेयक आणणार; सीतारमण यांची राज्यसभेत माहिती

बस कऱ्हाडकडे येत असताना पाठिमागून दगडफेक केली असल्याची माहिती वाहक अमोल वाघमारे यांनी माहिती दिली. दगडफेकीत कोणत्याही प्रवाशास दुखापत झालेली नाही. मात्र एसटीच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला गालबोट लागले आहे. दरम्यान कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com