esakal | 'या' जिल्हा बॅंकेची राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी; तब्बल ९७ टक्के कर्जवसुली!
sakal

बोलून बातमी शोधा

'या' जिल्हा बॅंकेची राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी; तब्बल ९७ टक्के कर्जवसुली!

जिल्हा बॅंकेने यावर्षीही आपली वसुलीची परंपरा कायम राखत शेती कर्जाची 97 टक्के वसुली करून राज्यात विक्रम प्रस्थापित केलेला आहे. दुष्काळ, पूरपरिस्थिती, कोरोनासारखे साथीचे रोग अशा अडचणीच्या परिस्थितीत सातारा जिल्हा बॅंकेने सढळ हाताने मदत केली आहे. वसुली प्रोत्साहनासाठी व्याज परतावा योजना राबविणारी एकमेव बॅंक म्हणून सातारा जिल्हा बॅंकेचा उल्लेख केला जातो.

'या' जिल्हा बॅंकेची राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी; तब्बल ९७ टक्के कर्जवसुली!

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्हा बॅंकेने यावर्षीही आपली वसुलीची परंपरा कायम राखत शेती कर्जाची 97 टक्के वसुली करून राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. खरीप पीककर्ज वाटपातही उल्लेखनीय कामगिरी केल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली. 

मागील वर्षीची पूरपरिस्थिती आणि यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे सांगून शिवेंद्रसिंहराजे व डॉ. सरकाळे यांनी म्हटले की, शेती व्यवसायावरदेखील या महामारीचा अनिष्ट परिणाम झाला आहे. तथापि, अशा प्रतिकूल परिस्थितीत बॅंकेच्या संचालक मंडळाने शेती कर्जाच्या वसुलीसाठी केलेल्या आवाहनास, तसेच विकास सेवा संस्था पंच समिती, सचिव व बॅंकेच्या वसुली यंत्रणेच्या विनंतीस प्रतिसाद देऊन बॅंकेशी बांधिलकी असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली आहे.

पोलिसांनी सौजन्य दाखवले तर कसा होतो कायापालट, वाचा सविस्तर

त्यामुळे जिल्हा बॅंकेने यावर्षीही आपली वसुलीची परंपरा कायम राखत शेती कर्जाची 97 टक्के वसुली करून राज्यात विक्रम प्रस्थापित केलेला आहे. दुष्काळ, पूरपरिस्थिती, कोरोनासारखे साथीचे रोग अशा अडचणीच्या परिस्थितीत सातारा जिल्हा बॅंकेने सढळ हाताने मदत केली आहे. वसुली प्रोत्साहनासाठी व्याज परतावा योजना राबविणारी एकमेव बॅंक म्हणून सातारा जिल्हा बॅंकेचा उल्लेख केला जातो. 

कोरोनाच्या भीतीने मायणी अभयारण्य पर्यटकाविना सुनेसुने

जिल्हा वार्षिक पत आराखड्यात 2020-21 करिता जिल्ह्याच्या एकूण पीककर्ज वाटप उद्दिष्ट 2200 कोटींपैकी सातारा जिल्हा बॅंकेला 1300 कोटी उद्दिष्ट होते. त्यामध्ये खरीप पिकासाठी निश्‍चित केलेल्या 950 कोटींच्या उद्दिष्टांपैकी आजअखेर दोन लाख 26 हजार 713 शेतकरी सभासदांना 1278 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. उद्दिष्टाच्या 134 टक्के पूर्तता करून पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकेने उल्लेखनीय काम केले आहे.

धरणांतील पुराचे पाणी 'या' दुष्काळी तालुक्‍यांना मिळणार ; सातारा सिंचन विभागास यश
 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयानुसार पीककर्ज परतफेडीस 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. जे शेतकरी अद्यापि पीककर्जाची परतफेड करू शकले नाहीत, ते नवीन पीककर्ज मिळण्यापासून वंचित राहिले आहेत, अशा सभासदांनी वाढीव मुदतीचा फायदा घेऊन पीककर्ज भरून शासनाच्या व्याज परतावा व इतर योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन डॉ. सरकाळे यांनी केले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top