सातारा ; तळागाळापर्यंत भाजप पोचवणार;आमदार जयकुमार गोरे

आमदार जयकुमार गोरे; वडूजमध्ये सत्कार समारंभानिमित्त कार्यकर्त्यांचा मेळावा
आमदार जयकुमार गोरे
आमदार जयकुमार गोरेsakal

वडूज : राज्यातील महाविकास आघाडीचे अपयशी सरकार अपशकुनी आहे. ते सत्तेत आल्यावर कोरोना आला, मराठा, ओबीसी आणि पदोन्नतीतील आरक्षण गेले. अतिवृष्टीने नुकसान झाले. शेतकऱ्यांची वीज तोडली गेली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि राज्याचे नुकसान करणाऱ्या अनेक घटना घडल्या. आगामी काळात तळागाळापर्यंत मजबूत संघटनात्मक बांधणी असलेला भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपचा साधा कार्यकर्ताच राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यापेक्षा मोठा असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.

येथे भाजपच्या वतीने आयोजिलेल्या सत्कार समारंभानिमित्त झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, विकल्प शहा, अनिल माळी, विश्वासराव काळे, नगरसेविका रेश्मा बनसोडे, रेखा माळी, किशोरी पाटील, जयवंत पाटील, सोमनाथ जाधव, बनाजी पाटोळे, प्रदीप शेटे, अमोल गोडसे, ओंकार चव्हाण, काकासाहेब बनसोडे, विक्रम रोमन, डॉ. वैभव माने, प्रशांत गोडसे, नीलेश कर्पे आदी उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले,‘‘ गेल्या १४ वर्षांपासून दोन्ही तालुक्यांतील अनेक महाभागांना फलटण, बारामतीपासून जिल्ह्यातील मात्तब्‍बरांची फौज विरोधात असूनही जयकुमार तीन वेळा आमदार कसा झाला, असा प्रश्न पडला आहे. माझ्या मागे सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेची ताकद असल्यानेच हे शक्य झाले आहे. सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. सर्वांच्या सहकार्याने पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे. फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात पूर्णत्वाला गेलेल्या विकासकामांची उद्‌घाटने करण्याव्यतिरिक्त आघाडी सरकारने अडीच वर्षांत काहीच केले नाही.’’ या वेळी श्री. चव्हाण, श्री. शहा, श्री. काळे, डॉ. माने आदींनी मनोगत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com