वडूज : 'या' मुळेच वर्षानुवर्ष वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या हाेताहेत केवळ बदल्या

वडूज : 'या' मुळेच वर्षानुवर्ष वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या हाेताहेत केवळ बदल्या

वडूज (जि.सातारा) : येथील ग्रामीण रुग्णालयानजकि उभारलेले रक्त साठवण केंद्र गेल्या वर्षभरापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात जिल्ह्यातील पहिले रक्त संकलन केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यासाठी रुग्णालयात एका खोलीमध्ये अत्यावश्‍यक ती साधनसामुग्रीही देण्यात आली होती. काही कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र, विविध शासकीय मान्यतांच्या निकषांत हे केंद्र मागे पडू लागले. त्यामुळे रक्त संकलन केंद्र सुरू होण्यापूर्वीच रखडले. ग्रामीण रुग्णालयात ज्या ठिकाणी या केंद्राला खोली देण्यात आली होती, त्या खोलीनजीक स्वच्छतागृह, शौचालय आहे. केंद्राची खोली अपुरी आहे. खोलीच्या परिसरात अस्वच्छता आहे, अशा विविध कारणांचा अडसर या केंद्राला ठरला होता. त्यामुळे रक्त संकलन केंद्रासाठी आलेली यंत्रसामुग्री तशीच धूळखात पडून होती. त्यामुळे येथील रक्त संकलन केंद्र म्हणजे नुसता फार्सच ठरले होते. वडूजसारख्या तालुक्‍याच्या मध्यवर्ती ठिकाणी रक्त संकलन केंद्राची जाणवणारी आवश्‍यकता याबाबत दैनिक "सकाळ'ने वस्तुस्थिती मांडून सातत्याने पाठपुरावा केला.
 
रक्त संकलन केंद्राच्या स्वतंत्र व नवीन इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुमारे 50 लाख रुपये खर्चाची ग्रामीण रुग्णालयानजीकच नवीन इमारत बांधली आहे. या इमारतीचे कामही बहुतांशी पूर्ण झाले आहे. या केंद्रात सुमारे शंभर बाटल्या रक्त साठविण्यात येणार आहे. रक्त संकलन केंद्राच्या आवश्‍यक त्या पूर्तता करण्यात आल्या असून, ते सुरू करण्याबाबत आरोग्य विभागाच्या सातारा, पुणे, मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. गेल्या वर्षभरापूर्वी सातारा येथील पथकाने याठिकाणी भेट देऊन रक्त साठवण केंद्राच्या इमारतीची पाहणीही केली आहे. आता पुणे व मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत हे केंद्र आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील रुग्णांची गरज ओळखून रक्त साठवण केंद्र कार्यान्वित होणे गरजेचे आहे. 

प्रशिक्षण अन्‌ बदली 

रक्त साठवण केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही दोन पदे आहेत. केंद्रात काम करणाऱ्या तीन ते चार प्रयोगशाळा तंत्रज्ञांना आत्तापर्यंत प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, रक्त साठवण केंद्र कार्यान्वित नसल्याने त्यांची बदली झाली. रक्त साठवण केंद्राची इमारत बांधून तयार असली तरी ती मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचे प्रशिक्षण होते. केंद्र सुरू नसल्याने नंतर त्यांच्या बदल्या होतात, हा प्रकार गेली काही वर्षे सुरू आहे.

सर्व रेशनकार्डधारकांना 31 जुलैपर्यंत मिळणार या याेजनेचा मोफत लाभ

सातारा जिल्ह्यात 'या' 393 गावांत कोरोनाचा शिरकाव
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com