सातारा : लग्नावेळी नववधूच्या दागिन्यांवर डल्ला

काशीळमधील घटना; चोरट्याने दोन लाखांचे दागिने पळविले
 Bridal jewelry wedding day
Bridal jewelry wedding daysakal

नागठाणे : काशीळ येथे असलेल्या मंगल कार्यालयातून अनोळखी चोरट्याने विवाह सुरू असतानाच नववधूचे दागिने पळविले. चोरट्याने सुमारे पाच तोळ्यांचे दोन लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स हातोहात लांबविली. अंजली जितेंद्र चेला (वय ६१, रा. हडपसर, पुणे) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील अंजली चेला यांचा मुलगा निरंजन याचा विवाह कऱ्हाड येथील आरती जाधव यांच्यासोबत होता. हा विवाहसोहळा काशीळ येथे महामार्गालगत असलेल्या एका मंगल कार्यालयात होता. प्रेमविवाह असल्याने हा विवाह सोहळा प्रथम स्थानिक रीतिरिवाजाप्रमाणे व नंतर तेलगू रीतिरिवाजाप्रमाणे पार पडणार होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास स्थानिक रीतिरिवाजाप्रमाणे विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तेलगू पद्धतीने विवाह विधी सुरू असताना मुलाची आई अंजली चेला यांनी नववधूला मानाच्या पाच कांजीवरमच्या साड्या व त्यांच्या पर्समध्ये असलेला सोन्याचा हार काढून ब्राह्मणाकडे दिला.

या वेळी अंजली चेला यांनी त्यांची पर्स जवळच्या खुर्चीवरच ठेवली होती. ब्राह्मणांकडे साहित्य दिल्यानंतर त्या लगेचच पर्स घेण्यासाठी वळल्या असता त्यांना खुर्चीवर पर्स आढळून आली नाही. काही क्षणातच अनोळखी चोरट्याने खुर्चीवरील पर्स हातोहात लांबविली. घटनास्थळावरून अनोळखी चोरट्याने अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन, दोन तोळे वजनाचे सोन्याचे हातातील ब्रेसलेट, सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व वाट्या, एक चांदीचा करंडा, एक मोबाईल, विविध बँकेचे डेबिट व क्रेडिट कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना असा सुमारे दोन लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हवालदार प्रवीण शिंदे पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com