esakal | त्यांनी ठेवले व्हॉटस्‌ऍप स्टेटस, वादांमुळे 56 जणांवर गुन्हा दाखल; 32 जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

त्यांनी ठेवले व्हॉटस्‌ऍप स्टेटस, वादांमुळे 56 जणांवर गुन्हा दाखल; 32 जणांना अटक

दोन्ही फिर्यादीत वादाची कारणे एकसारखीच आहेत. पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, संताजी जाधव, धनंजय कोळी तपास करत आहेत.

त्यांनी ठेवले व्हॉटस्‌ऍप स्टेटस, वादांमुळे 56 जणांवर गुन्हा दाखल; 32 जणांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ःव्हॉटस्‌ऍपवर स्टेटस ठेवण्यासह गावातील दोन वेगवेगळ्या भावकीत धुमश्‍चक्री उडाली. त्यानुसार तब्बल सुमारे 56 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्‍यातील येवती- काटेकरवाडी येथे निकम व काटेकर यांच्या भावकीत काल रात्री नऊच्या सुमारास मारामारीची घटना घडली. त्यात सुमारे 36 जखमी झाले आहेत. पैकी गंभीर चौघांवर कृष्णा व सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील एक वृद्ध गंभीर जखमी आहे. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल आहेत. त्यानुसार दोन्ही गटांतील सुमारे 32 जणांना अटक केली आहे.
सातारा जिल्ह्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
 
पोलिसांनी सांगितले, की येवतीपासून अवघ्या दोन किलोमीटवरील काटेकरवाडी येथे निकम व काटेकर भावकीमध्ये वर्षभरापासून वेगवेगळ्या कारणाने वाद सुरू आहे. त्यामध्ये व्हॉटसऍप स्टेटस ठेवणे, एकमेकांकडे खुन्नसने बघणे अशा कारणाने वाद होत होते. त्या त्यावेळी ते वाद गावपातळीवर मिटवले जायचे. काल रात्री नऊनंतर पुन्हा वाद उफाळून आला. त्यातूनच दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. त्याला कारणही तितकेच किरकोळ होते. दोन्ही गटाकडून पोलिसांत त्या प्रकरणात फिर्यादी दाखल आहेत. निकम भावकीकडून सागर वसंत निकम यांनी, तर काटेकर भाविककडून आकाश गंगाराम काटेकर यांनी फिर्याद दिली आहे. दोन्ही फिर्यादीत वादाची कारणे एकसारखीच आहेत. मारामारीत आत्माराम निकम, गंगाराम काटेकर व अन्य एक जण गंभीर आहे. त्यांच्यावर सह्याद्री व कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
निकम भावकीने दिलेल्या फिर्यादीत सागर काल रात्री नऊच्या सुमारास त्याचा घरी निघाला होता. त्या वेळी काटेकर भावकीतील लक्ष्मण काटेकर याच्याशी त्याचा वाद झाला. त्यावरून लक्ष्मण काटेकरने त्याच्या भावकीतील 15 ते 20 लोकांना घेऊन आला. त्यांनी तेथे सागर निकम याला मारहाण केली. मारहाण करणाऱ्या 17 लोकांना सागर निकमने ओळखले आहे. त्यांची नावे त्यांनी पोलिसांना दिली असून, त्या लोकांना अटक झाली आहे. अन्य दहा लोक मारहाण करायला होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सुमारे 30 लोकांवर गुन्हा दाखल आहे. त्याच वेळी काटेकर भावकीतील 30 लोक तेथे आली. त्यामुळे दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. त्याबाबत काटेकर भावकीतून आकाश काटेकर यांनी फिर्याद दिली आहे. आकाशने 17 लोकांना ओळखले, त्यांची नावे त्यांने दिली आहे. त्याही लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य 10 लोकांची ओळख आकाशला पटली नाही. दोन्ही गटांवर मारामारीसह अन्य कलमान्वये तालुका पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, संताजी जाधव, धनंजय कोळी तपास करत आहेत.

हे उपाय करा अन्‌ कोरोनाला टाळा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साताऱ्यातून गेले पत्र

ही पहा माणुसकीची झलक; जाणत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी

 

loading image
go to top