
Satara : छत्रपती संभाजीराजे धर्मवीरच ; शंभूराज देसाई
सातारा : छत्रपती संभाजीराजे यांनी धर्मांतरास नकार दिल्याने त्यांचा चाळीस दिवस अनन्वित छळ करत त्यांना मारण्यात आले. त्यांनी धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिल्याचा इतिहास असून, ते धर्मवीर, धर्मरक्षकच आहेत. त्यांच्याविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून, त्याचा करावा तितका निषेध कमी असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
हिवाळी अधिवेशनातील कामकाजाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. देसाई बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सरकारने ठरवलेल्या कालावधीनुसार दोन आठवड्यांचे हिवाळी अधिवेशनाचे काम पार पडले. या काळात राज्याच्या विकासाला चालना देणारी बारा विधेयके एकमताने मंजूर करण्यात आली.
नागपूर येथे हे अधिवेशन असल्याने विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे निर्णय देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार घेण्यात आले. या तिन्ही विभागांच्या विकासासाठी असणारी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.’’
या अधिवेशनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नागपुरात उपस्थित होते. त्यांना दिसावे म्हणून भास्कर जाधव व शिल्लक सेनेचे इतर आमदार सभागृहातील