esakal | साताऱ्यात फक्त हॉटेल, लॉजिंग सुरू करण्यास मान्यता; वाचा नवा आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

साताऱ्यात फक्त हॉटेल, लॉजिंग सुरू करण्यास मान्यता; वाचा नवा आदेश

सार्वजनिक व्यवस्थेअंतर्गत येणारी दुकाने काही अटीस अधीन राहून सुरू करण्यात आली होती. मात्र, हॉटेल, लॉज, थिएटर, जलतरण तलाव, जीम आदी सुरू करण्यात मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती.

साताऱ्यात फक्त हॉटेल, लॉजिंग सुरू करण्यास मान्यता; वाचा नवा आदेश

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यातील हॉटेलचालक, लॉजमालकांना अखेर सोमवारी (ता.३१)  दिलासा मिळाला. गेल्या पाच महिन्यांपासून बंद असणारे हे दोन्ही व्यवसाय सुरू करण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दोन सप्टेंबरपासून मान्यता दिली आहे.
 
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाने काही अटीस अधीन राहून लॉकडाउनची प्रक्रिया शिथिल केली होती. मात्र, काही व्यवसाय, उद्योग असे होते की, ते सुरू करण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने मागणी होत होती. तरीही जिल्हा प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असल्याचा आक्षेप घेतला जात होता.

तनिष्काच्या चित्रात उमटली स्त्री हक्काची छबी, अमेरिकेला दाखवून दिली सातारची खुबी!

सार्वजनिक व्यवस्थेअंतर्गत येणारी दुकाने काही अटीस अधीन राहून सुरू करण्यात आली होती. मात्र, हॉटेल, लॉज, थिएटर, जलतरण तलाव, जीम आदी सुरू करण्यात मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. त्यावर विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी साताऱ्यात फक्त हॉटेल आणि लॉजिंग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. 

आमच ठरलं ! आठ सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन

...हे राहणार बंद
 
शाळा, कॉलेज, कोचिंग क्‍लास, प्रशिक्षण संस्था 
चित्रपटगृह, जलतरण तलाव, बार, सभागृह, परिषद सभागृह 
रेल्वे, विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता 
सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू सेवन बंद 
धार्मिक, प्रार्थनास्थळे बंद, मात्र पुजारी, धर्मगुरूंना नियमित धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत.


लाहोटी, झंवर, सारडा, लढ्ढा, राठी चमकले; माहेश्वरीची काैतुकाची थाप

...हे राहणार सुरू 

हॉटेल, लॉजिंग बुधवारपासून सुरू 
व्यक्ती, वस्तूंच्या हालचालीवर कोणतेही बंधन नाही 
आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची आवश्‍यकता नाही 
खासगी बस, मिनीबस त्याचबरोबर इतर प्रवासी वाहतूक सुरू 
सर्व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत सुरू 
मेडिकल स्टोअर्स पूर्णवेळ सुरू 
लग्नसमारंभ, मेळावे आयोजनासाठी तहसीलदारांची परवानगी हवी 
सेतू केंद्र, महा-ई सेवा केंद्र, आधार केंद्र सुरू 
अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी.

सातारकरांनाे... रुग्णांसाठी बेड मिळत नाहीये, मग हे वाचा

loading image
go to top